Skip to main content

आस्वाद

आस्वाद — साहित्य, संगीत, चित्रपट आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणारे मराठी लेखन. रसिक मनाला भिडणारे आस्वादपर मराठी लेख येथे वाचा.

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 27/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.

परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा ....

मेक्सिकन गंबो

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 22/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा!

पापड

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 21/04/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.

पापड ही एक साईड डीश.
भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात
हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे
१) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो.
२)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी. व पोळ्यांच्या कडा थोडे लाटणे फिरवुन बन्द करुन घ्याव्यात.

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 20/04/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय.
१.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्यः
४ टे.स्पून बटर
३पातीचे कांदे स्लाईस करून
४५० ग्रॅम गाजर
१ टे.स्पून धने पावडर
५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक
१/२ कप गोड घट्ट दही
चवीनुसार मीठ, मिरपूड
२-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर

मटाचं मराठी पर्व

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 18/04/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे.

या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं.

त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे.

दुवे देत आहे.

एप्रिल फळ (७)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 17/04/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.

द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते.
द्राक्षाची ही तर्‍हा तर कलिंगडाची तर्‍हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही .
खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी.

गमतीदार ऊखाणे.

लेखक विवेकवि यांनी गुरुवार, 17/04/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटित
जळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर............ आहे रेडा.

अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.

मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.

एप्रिल फळ (६)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 16/04/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.

मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.