काचेची बरणी आणि २ कप चहा
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.
तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले.
मिसळपाव