Skip to main content

आस्वाद

अभिनयक्षमता

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 22/02/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते.... विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

प्रेम

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात पडणं सोपं असतं प्रेमात पडणं सोपं असतं पण प्रेम निभावणं कठीण असतं..... हातात हात घेउन चालणं सोपं असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन पाउलवाट शोधणं कठीण असतं, कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतं पण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतं माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतं पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालं करणं मात्र कठीणं असतं प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं पण ती वचनं आणि शपथा निभावनं मात्र फ़ारच कठीणं असतं प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं पण खर बोलून प्रेम टिकवनं मात्र नक्कीच कठीणं असतं म्हणून सांगते की प्रेमात पडणं सोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं.... एक वेडा प्रेमी
Taxonomy upgrade extras

संडे स्पेशल (फालुदा)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 20/02/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
फालुदा साहित्यः १/२ कप बारीक शेवया १ ग्लास फिजमधील चिल्ड दुध २ च.पिठी साखर/साधी साखर चवीनुसार ३ च्.सब्जाचे बी/ बासिल बी. १/२ कप पिस्ता आणि बदाम प्रत्येकी.

शिळा सप्तमी

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 20/02/2008 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 19/02/2008 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे. शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :) आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप व्यथा परि तव आज मानिनी ................... नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का? आभारी, --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

सूर्योदय

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 19/02/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाक्षींच्या सूर्यास्तामुळे मला ही सूर्योदयाची चित्रे टाकावीशी वाटली... नव्या घरातून टिपलेल्या उगवत्या सूर्याच्या छटा... (खालील चित्रप्रतिमेवर क्लीक करा आणि पिकासा अल्बममध्ये चित्रे पहा, किंवा इथे स्लाईड शो पहा)

संडे स्पेशल (दुधापासून केलेले पदार्थ)

लेखक स्वाती राजेश यांनी सोमवार, 18/02/2008 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा घरी दुध उरते अशावेळी तुम्ही काय करता? १.मी कस्टर्ड करते आणि फ्रिज मध्ये ठेवते आणि जी फळे असतील त्यांच्या फोडी करून ऐनवेळी त्यात घालून देते.

"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 18/02/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला ह्या "प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या डेडलाईन " मुळे पार डोक्याची मंडई झाली पण काम काही संपतच नाही . त्या पच्छिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात राबणाऱ्या 'वेठबीगार' मजुरांच्या पेक्षा आमची अवस्था बेकार झाली आहे. ३२ तास झाले अजून घरी गेलो नाही. आमचा मॅनेजर , ती टेस्टींग टीम, तो ऑनसाईट को-ऑर्डीनेटर पार 'रक्ताची चटक लागलेल्या खविसासारखे' मागे लागले आहेत.