संडे स्पेशल (खांडवी)
खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.)
साहित्यः
२ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा)
२ वाट्या भरून गुळ
४ वाट्या पाणी
१/४ टी.स्पून मीठ
१ टे.स्पून तेल
१/२ टी.स्पून वेलची पूड
१/२ वाटी ओल्या नारळाचा चव
१ मोठा तुकडा आलं किसून
२ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे.
१.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा.
२.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे. ते चांगले गरम झाले की त्यात मीठ, तेल, गूळ्,आल्याचा कीस, थोडा नारळाचा चव घालुन चमच्याने ढवळावे
३.गॅस बारीक करून त्यात भाजलेला तांदळाचा रवा घालून चांगले ढवळावे व वर झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे.
४.दोन-तीन वाफा येऊ द्याव्यात, म्हणजे झाकण काढून मधूनच ढवळावे.
५.शिजून घट्टसर गोळा झाला कि तूप लावलेल्या ताटात तो गोळा सारखा पातळसे थापून घ्यावा व वरती उरलेले खोबरे घालून हाताने दाबावे.
६.गार झाले की सुरीने वड्याकापून ट्रे मधे सजवून ठेवाव्यात व वाढतात खांडवी वर साजूक तूप वाढावे.
करायला अगदी सोपे आणि कोणी पाहूणे येणार असतील तर आधी करून ठेवता येते.
वाचने
10098
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
वाऽ
गुजराती खांडवी
In reply to गुजराती खांडवी by विजुभाऊ
विजुभाऊ,
याला..
In reply to याला.. by स्वाती राजेश
हो..
वा वा स्वातीताई सुरेख पा.कृ.,
सही
In reply to सही by वरदा
मला वाटते तांदूळ थंड असतो आणि खोबरेही थंडच
ह्म्म
खांतोळी
साजूक आणि खमंग!
संडे स्पेशल (खांडवी)