Skip to main content

शृंगार

माझा चारोळी संग्रह (२२ चारोळ्या)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(मी आत्तापर्यंत लिहिलेल्या २२ चारोळ्या मिसळपाव च्या वाचकांसाठी देत आहे! ) ------------------------------------------------------- (१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा "चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र...

प्रेमात तुझ्या...संपलो मी...!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात तुझ्या गुंतलो मी माझाच नाही उरलो मी प्रेमाच्या खेळात जिंकलो मी हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी..... भेटलीस तेव्हा हरखलो मी हसलीस तेव्हा हर्षलो मी रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी निघालीस तेव्हा हिरमुसलो मी..... तू दूर होतीस तेव्हा, तुझ्या हृदयात दिसलो मी परत कधी आलीच नाहीस तेव्हा, माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
काव्यरस

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

(आज अचानक गाठ पडे)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 15/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की?
काव्यरस

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक sur_nair यांनी रविवार, 14/03/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
विजुभाउंची कल्पना आवडली http://www.misalpav.com/node/11426. जरा वेगळा मार्ग निवडलाय पण प्रेरणा तुमचीच तुझ्या रेशमी केसांनी, केलीस काय किमया कित्येक गळे कापले, केलेस जीव वाया तुझ्या रेशमी केसांनी, आषाढमेघ लाजले श्वासात गंध भरुनी, उरात पूर वाहिले तुझ्या रेशमी केसांनी, उधाण येई अंधारा अवसेची रात्र काळी, कि देवळातील गाभारा? तुझ्या रेशमी केसांनी, भलतीच होय जादू वेणीत बांध यांना, नको मोकळे सोडू - आत्तापुरता एवढंच सुचतंय सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

नजर

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 11/03/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.

प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला | प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||

बोलूया नजरेनेच आज आपण | फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला ||

खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी | सुखासाठी आज त्या जगू दे मला ||

काव्यरस

आठव

लेखक आमोद यांनी मंगळवार, 09/03/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
वारा भन्नाट भन्नाट, फांदी फांदी धुमशान्, सखी तुझीया केशांचा, येई आठव बेभान . थेंब थेंब सुईगत, अंग अंग शहारत, सय तुझिया स्प्रशाची, माझ्या मनी उफाळत. गती वाढत वाढत तना मनात भीनते, तुझ्या सवेच्या दीसांतच, मन का हे डोकावते? चिंब ओलेत्या ढगांची, इथं गळाभेट होते, तुझिया मिठीची ओढ, मात्र फोफावत जाते. ह्या अचाट पाण्यात, दंगा माझिया मनात, फुफाटत वेडा खुळा, अग्निलोळाचा प्रपात.
काव्यरस

चंदनाचे जीवन

लेखक moghe यांनी शुक्रवार, 05/03/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
चंदनाचे जीवनच असं असते, नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते स्वत: मरत असला तरी, लोकांसाठी जगायचे असते नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं नको असलेली काही नाती आयुष्यभर वागवावी लागतात, आणि मनात जपलेले काही बंध आयुष्यभर अबोलच राह
काव्यरस

बघता बघता

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता दिवस सरतात ,लहानाचे मोठे होतो जीवनाच्या वाटेवर मग सुंदर एक क्षण येतो नवे पर्व ,नवी नाती सगळा नवं नवं असतं कुणीतरी अश्यावेळी सोबत हवं हवं असतं क्षितीजामागे सांजवेळी जग अगदी छान दिसतं स्वप्नातल्या राज्यात मग दोघांचं गाव दिसतं सूर मग जुळून येतात, स्वप्नवत होतो आभास हृदयाला दोघांच्या पुरतो एकच श्वास एका प्लेट मध्ये मग भेळ पुरी तिखट असतानाही गोड लागते ती जवळ असताना ,पाण्याविनाच तहान भागते ती च्या ती मध्ये मग माझ्यातला मी असतो तिच्यातल्या तिला पाहताना, माझा मीच हरवून बसतो
काव्यरस