मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

)तुझ्या रेशमी केसांनी(

sur_nair · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
विजुभाउंची कल्पना आवडली http://www.misalpav.com/node/11426. जरा वेगळा मार्ग निवडलाय पण प्रेरणा तुमचीच तुझ्या रेशमी केसांनी, केलीस काय किमया कित्येक गळे कापले, केलेस जीव वाया तुझ्या रेशमी केसांनी, आषाढमेघ लाजले श्वासात गंध भरुनी, उरात पूर वाहिले तुझ्या रेशमी केसांनी, उधाण येई अंधारा अवसेची रात्र काळी, कि देवळातील गाभारा? तुझ्या रेशमी केसांनी, भलतीच होय जादू वेणीत बांध यांना, नको मोकळे सोडू - आत्तापुरता एवढंच सुचतंय सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/

वाचने 1298 वाचनखूण प्रतिक्रिया 0