मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नजर

प्रभो · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस

प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला | प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||

बोलूया नजरेनेच आज आपण | फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला ||

खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी | सुखासाठी आज त्या जगू दे मला ||


वाचने 1541 वाचनखूण प्रतिक्रिया 5

शेखर 11/03/2010 - 09:26
प्रभ्या, तुला आज काय जरा जास्तच आठवण आली का तिची? बाकी कविता छान...

मेघवेडा 12/03/2010 - 02:28
नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला || मस्त रे! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!

In reply to by मेघवेडा

शुचि 12/03/2010 - 02:34
हेच म्हणते *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

प्रभो 12/03/2010 - 03:11
धन्यवाद. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

रेवती 12/03/2010 - 05:13
भावना कागदावर तर चांगल्या उतरल्या आहेत्.......प्रत्यक्षात कधी उतरवणार?:) रेवती