मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

शब्दखेळ

स्पंदना ·
लेखनविषय:
शुभ् प्रभात!! मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय. (कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!!

जावा तिकडे

पाषाणभेद ·
काव्यरस
जावा तिकडे उं.. जावा तिकडे मी नाही येत, तुम्ही ना गडे सोडा मला आता, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||धृ|| शौकिन तुम्ही हे आसलं, नाही म्हणत नाही कधी हौस जीवाची करता, सोडत नाही एकही संधी अंहं...

अशी लाजू नको

पाषाणभेद ·
काव्यरस
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ|| स्वप्नातले रुप आज सत्यात आले हातात घेवून मी ते पारखले सहवासात तुझ्या विसरलो जगा अशा समयी वेळेची फिकीर नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१|| फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे तसाच गुलाबी रंग रूपास दिसे रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०५/२०१०

अबोल प्रीत

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती! मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती! रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती! अधरांच्या उंबर्‍यात नाव तुझे का अडते? अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते? लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!

मोहविते मज तव गंधीत कांती

पाषाणभेद ·
काव्यरस
मोहविते मज तव गंधीत कांती
चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात. (मी काही गायक नाही.

हळू हळू...चालव तुझी फटफटी

पाषाणभेद ·
काव्यरस
हळू हळू...चालव तुझी फटफटी तुझ्या मागे बसायची वाटत नाही भिती तरीही तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी ||धृ|| घरी न बोलता आले निघून केवळ तूझ्या सांगाव्या वरून कॉलेजला जाते खोटं बोलता घरी संशय न कसला आता मोकळी झाले मी, न पाठी कटकटी ||१|| आता तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी तोंड झाकले रुमालाने रे न चेहेरा दिसे माझा कूणाला बापही जरी आला समोरी तो न ओळखी मला आता घाई कशाला, नको त्या कसल्या लटपटी ||२|| म्हणून तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी आडव्या तिरप्या रस्त्यांनी जावूनी फिरव मला सारे गाव ओळख

..मैफिल..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
काव्यरस
पसरता सभोवती, धुंद केतकी हवा.. रान पेटले असे,मेघ तु मला हवा.. शिंपिता नभातले चांदणे तनावरी.. घुमु लागला मनी,पारव्यांचा थवा.. सप्तरंगी नाहता,मधाळ स्मित चुंबिता.. मनी दाटला असा,अवीट एक गोडवा.. तु मला लपेटता, श्वास उष्ण गुंफता.. मनामध्ये पसरला..धुंद कुंद गारवा.. रात्र थांबली जणु,रात्र लांबली जणु.. खेळ प्रीतीचा असा बहरला नवानवा.. मैफिलित ह्या तुझ्या तनिमनिमी गुंतले.. झंकारले मनातुनि ,बोल हेच वाहवा.. ऐक रे सख्या अता,निवांत शांत स्तब्धता.. तृप्त रोग भोगला,पुरे जाहली दवा.. अजाणता असा कसा पाय हा घसरला.. करु नकोस रे सख्या..कधी कुठे ..शू...गवगवा. - योगेश जोशी.

पहिला पाऊस

बरखा ·
लेखनविषय:
काव्यरस
पहिला पाऊस वळ्वाचा पाऊस आधी देखील पडला होता, पण्..कालचा पऊस मात्र, माझ्या साठी पहिलाच पाऊस होता दोघा॑नी पहिल्या॑दा एकत्र पावसात भिजण्याचा आन॑द लुटला होता, तु मात्र माझी वाट पाहुन ओलाचि॑ब झाला होता मी भिजु नये म्हणुन अडोशाला था॑ब म्हणत होता मी मात्र त्या दिवशी हट्टाला पेटले होते तुझ्या सोबत पावसात मला देखिल ओलेचि॑ब व्हायचे होते तुझ्या गालावरुन ओघळ्ण्यार्‍या दव बि॑दुत मला माझे प्रतिबि॑ब पहायचे होते माझ्या बटेतुन गळणारे पावसाचे थे॑ब तुझ्या खा॑द्यावर पाडायचे होते छत्री न्हवती म्हणुन काय झाले एका ओढणी खाली दोघा॑नी बसायचे होते, पण्..तु सा॑गितल्यावर पावसाने ही था॑बायचे ठरवले होते अ॑गावर शहार

धनी माझं कसं येईना अजून

पाषाणभेद ·
काव्यरस
धनी माझं कसं येईना अजून
दिस हा गेला रात चढली कितीक बसावं सजून धजून वाट पाहूनी डोळं थकलं धनी माझं कसं येईना अजून ||धृ||
रातीचा मी शिणगार केला शेज सजवूनी गजरा माळला शालू नेसूनी तयार झाले कुंकू ल्याले भांगातून ||१|| धनी माझं कसं येईना अजून
सांगून गेलं आठदिस झालं कुठं आसलं कुना ठावं लवकर येतो म्हनलं होतं लढाईतून परतून ||२|| धनी माझं कसं येईना अजून
काळीज माझं चिमनी जसं नाही काही थार्‍यावर फोलपणा हा सजण्याचा न जाई मनातून ||३|| धनी माझं कसं येईना अजून - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०४/२

ऐक माझ्या फुला..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा गंधल्या अंतरी, दे मला, आसरा कोवळे रूपडे , नाजुका कोमला गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा आसमानीच गं तू परी लाजरी सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा गोड वाणी तुझी गं मरंदापरी तू असे मंजुळा की असे शर्करा! मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली तू निशीगंध की तू असे मोगरा!! ही निळाई तुझ्या लोचनी दाटली धुंदला रंग हा, लाजवी सागरा पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू छेडती दादरा त्या खुल्या अंबरा साद तू घातली, चैत्र हुंकारला ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा - प्राजु गालगा, गालगा, गालगा, गालगा