मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

चांदण्याचे ओठ तुझे

अरुंधती ·
लेखनविषय:
काव्यरस
चांदण्याचे ओठ तुझे चंद्रमा चेहर्‍यातला रात्र काळे केश अवघे नेत्रात दर्या उफाळला शब्द सुमधुर दिव्य झंकार श्वासांत सुगंधही दाटला वारुणी नेत्रात तुझिया रात्रवणवा पेटला पदन्यासाने तुझिया राजहंसी थिरकला भृकुटीविभ्रमाने तव मन्मनही घायाळला यौवनाची नवनव्हाळी मोगराच अंगी फुलविला गुल्मोहरी वेणुतला निषाद कुणी आज झंकारिला? [फार वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना ''झालेली'' कविता! :) ] -- अरुंधती

बैठकीची लावणी: करीते मी विडा

पाषाणभेद ·
काव्यरस
रसीक मंडळी, खास आपल्यासाठी बैठकीची लावणी सादर आहे. दाद द्या खालील रचनेतील धृपद घोळवून घोळवून म्हटले असता आपसूक चाल बांधली जाते.
बैठकीची लावणी: करीते मी विडा
कळीचा चुना लावूनी काथ करीते मी विडा हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा कळीचा चुना...

..नको रातराणी नको पारीजात..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
काव्यरस
नको रातराणी नको पारीजात ------------------------------------------- नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात. जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात. विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे. जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात. जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर. उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात. तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला. जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात.

आडवाटंनं जाता जाता

पाषाणभेद ·
काव्यरस
मंडळी, परवापासून तुमी लावन्या वाचू वाचू कटाळला असाल. तवा एक युगलगीत ऐका. हिरो आन हिरवीन आपले त्येच हायती. पन ती काय आता लावनी म्हनत नाय. तवा ऐका जरा कान देवून त्ये काय म्हनत्यात त्ये.

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

पाषाणभेद ·
काव्यरस
सिच्युयेशन: आपल्या हिरो चं रसाचं दुकान हाये. त्यो रस काढत आसतो. तवाच हिरवीन तहानेनं व्याकूळ होवून त्याच्या दुकानी येती. उन्हामुळं हिरवीन पानी प्याया मागते. हिरो तिला रसाच्या दुकानात पाहूनशान लय गोंधळून जातो. त्याला काय करावं त्येच समजत नाय.

आस ! जन्मो जन्मीची ! !

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
आस ! जन्मो जन्मीची ! ! मस्तीत होतो मी बरा, का साद मजला घातली ? ना जंर होणार माझी का आस वृथा हि दाविली ? याद तव नाही असा, क्षण एकहि न पाहिला. वेदनांचा अधिकार मजला तोही तू ना ठेविला ! घेवूनी सल ही उरी, जन्म हा काढू कसा ? वेदनांचे शब्द हृदयी जपुनी मी ठेऊ कसा ? लागले नेत्र पैलतीरी अता, कुरवाळू कुठवर यातना. तोडून बंध सारे तू, ये मज आता भेटण्या ! ! ना जंर तू मज भेटली येईन परतुनी मी पुन्हा, घेउनिया जन्म दुसरा शोधित तव पाऊलखुणा ! ! ! निरंजन वहाळेकर

नका अंगचटीला येवू

पाषाणभेद ·
काव्यरस
मंडळी, पुन्यांदा रामराम. आज परत ही लावनी ऐका. आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं. पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्‍या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा.

घाट चढा आता

पाषाणभेद ·
काव्यरस
मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया. सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...) (राजेश घासकडवींचे अन Nile यांचे खास आभार.

..विश्वामित्र..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
काव्यरस
...विश्वामित्र.... नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.. लगबगीने जाशी तु.. केस ओले आवरीत.. ओला पदर सावरीत.. उतरावया दुधाचे भांडे ते उष्ण.. मी पुजेत दंग..पडे सारखा सारखा..लंगडा तो बाळकृष्ण.. हलक्यानेच पुसशी तु.. अंगावरुन ओघळते मोती.. वाटे..सारे देव देव्हार्यातले तुला वळुन वळुन पाहती.. माझ्या नावाचे ते कुंकु.. तु लावशी ठसठशीत.. दिसशी रुपवान अप्सरा.. मी मंत्र पुटपुटे अडखळीत.. गंध..सुवासिक लावुनि.. कशी फिरशी तु घरभर.. पुजा उरे उपचार मन माझे सैरभैर... बांधीशी तु गाठ अशी... बघुन पाठमोरी आरश्यात.. आरती चाले कशीबशी माझे लक्ष लागेना कशात.. रोज रोज सका