मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

फुलांच्या थव्यांनी..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
फ़ुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे तुझा गंध लेऊन गंधीत व्हावे.. तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे' जसा चंद्र अवनीस बिलगून जावा तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.. - प्राजु वृत्त : भुजंगप्रयात लगागा, लगागा , लगागा, लगागा

लावणी - खास होळी निमित्त

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
गेली संक्रांत आली बाई होळी हो नाही काही तुमचा पता कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो सन भाग्याचा, आहे फार मोठा घरला या धनी, राग आता सोडा तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो दिस उन्हाळी, सोसवेना उन किती पुसावं, घामाघूम अंग आग लावी राती, चंदनाची चोळी हो तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे विझली होळी अन, राख उरं मागे, रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली.

चल उसात दंगा करू

पाषाणभेद ·
काव्यरस
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

३ चारोळ्या

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या हृदयाची स्पंदने तुझा हळुवार श्वास प्रणयी संगीताचा जणू एक नवा आभास ****** वाऱ्याचा वेगही कधी सहज मंदावतो तुझ्या गंधाने वेडा तोही छंदावतो ****** कधी तुझा स्पर्शही मला मोरपिसापरी भासे आताशा तुझे श्वासही वाटतात जणू उसासे

तुझ्या मिठीच्या धुंद सरी..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझा दुरावा घायाळ करी ओढ अनावर माझ्या उरी.. उदासवाण्या सायंकाळी नकोस छेडू आसावरी आठवताना स्पर्श तुझा हृदयामध्ये उठे शिरशिरी देहामध्ये भिनून राही नाव तुझे रे रूधिरापरी दिठीमध्ये भाव तुझे अन गीत तुझे या ओठावरी चिंब करती पुन्हा पुन्हा मज तुझ्या मिठीच्या धुंद सरी - प्राजु

तुझे माझे गुलाबाचे

पुष्कराज ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

गुलाबाचा सण होता

पुष्कराज ·
लेखनविषय:
काव्यरस
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही

देणे

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य

(कविते, हे तर तुझेच देणे..!)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
माताय! असला लॉलीपॉप हाफवॉली मिळाल्यावर काय करावं बरं म्या पामरानं?