Skip to main content

शृंगार

आरसा अथ ते इथी

लेखक झुम्बर यांनी शनिवार, 24/04/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी खूप मजा यायची त्याच्या मध्ये डोकावताना मीच स्वताचे पाहुनी बोळके हसायची रडता रडता मग मी थोडी झाले मोठी आरसा परी तोच होता गणवेशातले रूप वाढते तोही अलगद निरखत होता मग मी चढले शिडी नाजुकशी तारुण्याच्या उंबरठ्यावरी आणि सर्वांगावर माझ्या शृंगाराची फिरली नक्षी आरसा..... मग माझा सखाच झाला संवाद तासन तास झडू लागला नित्य नवा साज बहराचा अंगांगी माझ्या उमलू लागला मग ती मोहक वेळ आली आयुष्याच्या वळणावरती साद कुणी ती घालून हळवी मोहविले मज मनी मानसी आरसा .... नित्य सख्या स्तव सजता सजता आरसा कानी सांगतसे आज चढव हा साज नवा तोच सख्या मोहवितसे चालुनी मग ती सप्तपदी झाले सात जन
काव्यरस

जाऊन जराशी येते

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 23/04/2010 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी? दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

स्पर्शून तारकांना..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 23/04/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्शून तारकांना गाई पहाट वारा कंपीत शब्द माझे आणि तुझा इशारा!!! गंधात नाहलेली, लाजून जात जाई घेई उगा मिटूनी, तो शुभ्रसा पिसारा झंकारले अशी की, काया सतार झाली तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा आली भरात आता, भलतीच प्रेम वेला बेबंध श्वास माझे आणि तुझा उबारा.. स्पर्शात या तुझ्या रे, वर्षाव हा हिमाचा पेटून तप्त होई, माझ्या उरी निखारा दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा - प्राजु
काव्यरस

समोर आता येते कशाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/04/2010 06:07 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आता येते कशाला
समोर आता येते कशाला ||धृ||
समोर आता येते कशाला, तिर नजरेचा मारतेस मला मदनबाण लागतो ग उरी, जखम खोलवरी ठाव नाही ग तुला ||
समोर आता येते कशाला ||१||
याद असतीस मनी राहूनीया दुरी काळीज धडधडता काय न कळे ग मला होईल वेडा असेच वाटे ग मला ||
समोर आता येते कशाला ||२||
वाटे संगती असावीस सदा, नयनी माझ्या न गाळावे आसवांना कितीदा तरी हसलो समोरी, तू ग उभी तरीही न कळावे का तुला ||
समोर आता येते कशाला ||३|| - पाषाण
काव्यरस

तू असं यावस......

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 22/04/2010 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू असं यावस.... नकळत........ थंडगार वाऱ्याच्या झुळकी सारख.... गरम उन्हाच्या झळा माग साराव्यास...
काव्यरस

.....घडावे असे काही.....

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 18/04/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
.....घडावे असे काही..... ------------------------------ घडावे असे काही सुंदर आणि गोड.. वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड.. लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने.... हलकेच जाग यावी..
काव्यरस

कान्हा रे कान्हा असे काय करी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/04/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा रे कान्हा असे काय करी (चाल १): दही विकाया गोपी निघाल्या मथूरेच्या बाजारी वाट अडवून कान्हा बसला म्हणे दही कर द्यावा करी प्रिती पाहूनी कान्हाची आपल्यावरी गोपीका त्या वरवर रागावती लटका लटका नकार देती परी मनी सुखावती वाट अडवूनी कान्हा त्यांची छेड काढी कारण करूनी कान्हा मडके फोडी कान्हा मडके फोडी (चाल बदलून): कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी फोडीलेस तर सोडीव मज ती गोडी ||धृ|| विरहाची सवय होत असतांना मला तुझ्याकडे पुन्हा का ओढी? ओढीत असता वस्त्रे न माझे फेडी ||२|| कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी ||धृ||
काव्यरस

लावणी: आणा मला येवला पैठणी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
आणा मला येवला पैठणी सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी आजच आणा मला येवला पैठणी ||धृ|| जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार लई दिसांची ईच्छा आहे मनी आजच आणा मला येवला पैठणी ||१|| आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी आजच आणा मला येवला पैठणी ||२|| नितळ काया माझी वर तुमची माया जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी आजच आणा मला येवला पैठणी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०४/२०१०
काव्यरस