जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||
इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||
कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||
सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||
फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||
आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती
मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती ||
बाकी सारे बेवारस अन कुणीच न
बाबौ, आता "पुरे मास्कवून"
मस्त लिहिलंय..
यांचा घाबरवण्याचा धंदा
प्रतिसाद देणार्या