मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्त कविता

मराठी भाषा गौरव दिन अभंग

सागरसाथी ·
लेखनविषय:
मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२ मराठी भाषा गौर

एकाकी

सागरसाथी ·
लेखनविषय:
काव्यरस
एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे. कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे. दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे. स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे. आपले आपले करता हात रिक्त होती दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे. आनंदाने जगताना जपले ही पाहिजे जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे.

व्हॅलेंटाईन दिनी

श्रीगणेशा ·
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

आक्रीत

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज

कळले तुजला?

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
कारण काढून भेटायाचे किती दुरूनी आलेला तू! लपवलेस तू मनातले तरी किती बाभरा झालेला तू! कळले मजला... विचारसी तू देऊन हाती चित्रे काही सापडते का यांच्यामधले लपले अक्षर? इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर कळले तुजला? मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर? केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर कळले तुजला?? श्वास रोधुनी उत्सुक मी रे काही घडण्या.. मिसळून गेली शब्दांमध्ये चित्रे झरझर.. काय बोलले किंवा हसले काही स्मरेना आठवते ती अनोळखीशी नाजूक थरथर.. कळले तुजला??? किती मनाला आवरले तू... आणि मलाही सावरले तू.. कळल

चिंब

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
वृक्ष जसा - अंकुरण्या आधी बीजस्वरूपी अस्फुट असतो बाण जसा- सुटण्याच्या आधी प्रत्यंचेवर सज्ज राहतो मंत्र जसा - स्फुरण्याच्या आधी बीजाक्षरी निद्रिस्त राहतो अर्थ तसा उलगडण्या आधी शब्दांच्या निबिडात राहतो ओथंबून मग येतो अवचित कोसळतो अन् चिंब भिजवितो

मालाडचा म्हातारा...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
म्हातार्‍याचे भिरभिर डोळे- आठवणींचा भुगा भुगा छटाक उरले खोड, पोखरी कभिन्न काळाचा भुंगा म्हातार्‍याचे वखवख डोळे- लवथव गोलाई बघती दारु संपला जसा फटाका दावू न शकतो स्फोटभिती म्हातार्‍याचे टपटप डोळे- पापणीत पाऊसमेघ जसा वळीव कोसळतो कधिही तसा कढांचा आवेग म्हातार्‍याचे विझुविझू डोळे- पैलतिरी काऊ बघती कोकुनी हाकारितो अहर्निश उडून जा त्याला म्हणती

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार ·
लेखनविषय:
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

तुझे गाणे

अनुस्वार ·
मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

ऐसे ऐकिले आकाशी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"