मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्त कविता

तुझे चालणे दरवळून जाते.......

किरण कुमार ·
लेखनविषय:
उन्हाला कसा थांगपत्ता नाही कसे झाकले नभाला धुक्याने इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............ प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते गंधीत मृदाचे तृणांचे शहारे इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा गगनातूनी जणू थव्यांचे पहारे ............. इथे धुंद असते अशी शर्वरी की कुठे चांदणे विरघळून जाते किती बोलणे ते चमकत्या विजेचे तुझे चालणे मात्र दरवळून जाते .............. - किरण कुमार

वार्‍याने पेटते रान आता हे ..

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला ठिगळे अनेक रंगबेरंगी.. पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली बेसुमार झीज पायाची .. वार्‍याने पेटते रान आता हे कशास विचार फुका.. होरपळले शेत जरी हे ढेकळाचा रंग काळा तो काळाच.. ठिंणगी बनलेला विचार तुझा तू दूर आकाशातील तारा .. ओसाड ह्या जगण्यावरती उगा बुजगावण्यांचा पहारा.. दगडाला कुठे फुटतो पाझर ? कुठे शोधु देवपण त्याच्यात ? जन्मलो मातीत या पुन्हा मातीत मिटण्यासाठी... -- शब्दमेघ (शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)

कधीतरी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
उल्कापाताच्या आतषबाजीने दिपून जातोय मी आज पण कधीतरी चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात अंतर्बाह्य उजळायचंय मला शब्दांच्या समृद्ध अडगळीत हरवून जातोय मी आज पण कधीतरी शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात निरुद्देश पोहोचायचंय मला नीटनेटक्या रंगरेषा रेखाटतोय मी आज पण कधीतरी अमूर्ताचं असीम अवकाश अनवट रंगांनी भरायचंय मला त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात घुसमटतोय मी आज पण कधीतरी स्थलकालाचं वितान व्यापून थोडं थोडं उरायचंय मला

हाक आभाळाची येता

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते जुन्या व्रणावर रोज नवी जखम करते अनावर भोवंडून शिणलेल्या प्राणासाठी वाटेवरच्या झाडाची साथ वाटे मला मोठी त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर इवल्याश्या कंठातून काढी तरल लकेरी हाक आभाळाची येता झेपावते दिगंतरी

नीरव

सरीवर सरी ·
लेखनविषय:
काव्यरस
असंख्य काजव्यांच रान अंधाराला लावला टित सरू नये उरू नये गाणं मर्मभेदी घुसलाय मान तरंगावर पहूडली कात अशी ही नीरव कवनं

...पाहिले म्यां डोळा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी. अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी. संपतील एकदाची आत्ताच की, ध्रुपदत राहतील व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात आज उद्या परवा?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

प्राची अश्विनी ·
काव्यरस
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.. सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता? झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता? काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता?? मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता? म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर! व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो, तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं. आणि online दिसूनही blue tick न दिसणं, काय सांगू?

आजकाल

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
कोलाहलात गर्दीच्या एकांत मी कवळतो अंधारून येता मीच अंतर्बाह्य झळाळतो रिक्ततेच्या डोहामध्ये सदा सचैल डुंबतो शून्य असूनही थेट अनंताशी झोंबी घेतो आठवता आठवता पुन्हा त्याला विसरतो दशदिशा कोंदून जो दहा अंगुळे उरतो

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
पान खाता खाता आठवतं काहीबाही.. हिरव्या कंच पानाचा देठ नखंलताना आज्जी म्हणायची, "स्वस्ताई होती तेव्हा... दोन रुपयांना हेss पोतंभर तांदूळ. ओंजळीनं घ्यायचो तपेल्यात... वाटी वगैरे नाही आत्तासारखं.." पान मांडीवर पसरायची, सुरकतलेल्या हातात अडकित्ता घ्यायची, "चोर पकडले जायचे, शिक्षा व्हायच्या... आत्तासारखं नाही." चंचीतली सुपारी आडकित्त्यावर अलवार कातरायची ती.. पानावर चुन्याचं अल्लद बोट लागायचं, त्यावर कात सुपारी मांडत म्हणायची, "इंग्रज गेले आणि सगळी शिस्त गेली. शिस्त गेली तशी स्वस्ताई गेली." पानाची घडी करून ती तोंडांत सारून ती पुढे सांगायची, "पूर्वी पानात केशर घालायचे मी.