मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विस्कळखाईत कोसळताना

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रेणुबंध होतील खिळखिळे खळकन् फुटतील ठाशीव साचे हादरून जातील स्तंभही तर्काच्या भक्कम इमल्यांचे गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या लाव्हारस येईल उधाणून अगणित जीवांचा कोलाहल उरेल भवतालाला कोंदून विस्कळखाईत कोसळताना असेच काही घडेल? किंवा, विज्ञानाचे ज्ञात नियम मग वागतील वेगळेच तेव्हा?

वाचने 3372 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by गॉडजिला

तुषार काळभोर Tue, 08/10/2021 - 06:14
विज्ञानकाव्य तेही ब्लॅकहोल वर तेही विस्कळखाई सारख्या सर्जनशील शब्दांनी तयार केलेलं.. असं काही सुचतं हेचं एक अशक्य काम आहे..