मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाथा

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुकारामाच्या गाथेने जेव्हा पछाडले मला तेव्हा ज्ञानोबा नावाचा एक मांत्रिक शोधला भ्रम रिंगण तोडून ज्ञानोबाने केली शर्थ कानामध्ये सांगितला गहनाचा गूढ अर्थ त्याची बहीण मुक्ताई सार्‍या मांत्रिकांची माय सूर्य गिळण्या ही मुंगी नभ उल्लंघून जाय "गाथा बुडवून टाक" मला मुक्ताई दटावे गाथा तरंगून येते अंतर्यामी तिला ठावे गाथा रक्तात भिनते गाथा वज्रलेप होते शब्द रोकडे बोलत पुन्हा पुन्हा पछाडते

वाचने 3979 वाचनखूण प्रतिक्रिया 8

ज्ञानोबाराया माझा, कुणी मांतरीक नाही, ज्ञानेशाच्या अभंगाला, तुकाराम पुढे नेई, पाया रचिला माउलिने तुका बांधितो कळस, त्यांच्या ज्ञानाची लावुया अंतरंगी रे तुळस त्यांनी दाखवली वाट थोडे चालूया ती वर, पायधुळ त्यांची लावू लीन पणे माथ्यावर ज्ञान मार्गी ज्ञानेश्वरी गाथा पाण्यात तरते, अनुभवता एक ओवी अंतरंग उजळिते या मातीत जन्मलो भाग्य माझे उजळले, ज्या मराठी मातीत ज्ञाना-तुका तळपले पैजारबुवा,