Skip to main content

विस्कळखाईत कोसळताना

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 08/08/2021 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
रेणुबंध होतील खिळखिळे खळकन् फुटतील ठाशीव साचे हादरून जातील स्तंभही तर्काच्या भक्कम इमल्यांचे गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या लाव्हारस येईल उधाणून अगणित जीवांचा कोलाहल उरेल भवतालाला कोंदून विस्कळखाईत कोसळताना असेच काही घडेल? किंवा, विज्ञानाचे ज्ञात नियम मग वागतील वेगळेच तेव्हा?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3387
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by गॉडजिला

विज्ञानकाव्य तेही ब्लॅकहोल वर तेही विस्कळखाई सारख्या सर्जनशील शब्दांनी तयार केलेलं.. असं काही सुचतं हेचं एक अशक्य काम आहे..

रचना आवडली ! यावरुन मला जी घटना आठवली त्यावरील एक लेख :- 14 Agonizing Photos Of Pompeii’s Bodies Frozen In Time

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre