रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3380
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं काही सुचते
+१
In reply to असं काही सुचते by गॉडजिला
मस्त.. नेहमी प्रमाणेच
+१
In reply to मस्त.. नेहमी प्रमाणेच by ज्ञानोबाचे पैजार
रचना आवडली ! यावरुन मला जी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatreरचना आवडली
प्रतिसाद देणार्या