वाडा
लेखनविषय:
काव्यरस
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||
इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||
कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||
सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||
फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||
आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती
मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती ||
बाकी सारे बेवारस अन कुणीच नाही वाली त्याला
जुनाट जाते, चूल मोडकी, फडताळातील जुनाट शेला ||
वाड्या सोबत जीर्ण जाहली मोहाची ही जीर्ण बंधने
किंमत उरली जागेला बस, फक्त तिचे हे वाट पाहणे ||
उद्या तिचीही होईल भेट उरल्या सुरल्या ह्या भिंतींशी
अन मग नंतर जडेल नाते नवीन घरांच्या नवलाईशी ||
बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी
किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणी ||
उन्नती अवनीतीच्या लाटांवर प्रवास त्याचा असा निरंतर
तशाच तैशा अलिप्तपणाने आपण पाहु हे स्थित्यंतर ||
-
प्रसाद गोडबोले
वाचने
8232
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मस्त एकदम
छानबघता बघता वाडा जाईल
बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणीछानबघता बघता वाडा जाईल
बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणीसत्यता काव्यात उतरली आहे. छान
In reply to सत्यता काव्यात उतरली आहे. छान by पाषाणभेद
धन्यवाद पाभे !
छान कविता.
मस्त झाली आहे
खूप सुंदर. पोचली आणि आवडली
व्वा, भारी !
🏆
+१छान
कविता आवडली.
र्हदयस्पर्शी कविता. फोटो अवश्य टाका.
In reply to र्हदयस्पर्शी कविता. फोटो अवश्य टाका. by चित्रगुप्त
नमस्कार काका !
आवडली
कविता आवडली, अश्या वाड्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]वाडा ...... काळाच्या ओघात अस्तास जाणारा
वाडा म्हटलं की मला
कविता आवडली. वाड्याचं चित्र
चित्रदर्शी कविता....हळवी भावना, उदास वाटले
फार सुरेख गेय आणि चित्रदर्शी
कविता आवडली