Skip to main content

मुक्त कविता

मित्रा

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 04/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेण्या बंदुकांच्या फैरी फुटणारे बॉम्ब जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी या सार्यांना समजावता येईल रे, पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी. तुला कस समजावणार आता !! खैर शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा जिप्सी
काव्यरस

तीर्थ

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 03/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तीर्थ कुठले ? इथे कसे? कुणी आणले? काय तो आस्तिक! कोण त्याचा देव? काssssही विचारु नका. तीर्थ घ्या. ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे. वाद नको. विचार नको. गंगा काय न् नर्मदा काय.... याच समुद्रात मिसळतात! बसा निवांत. तीर्थ घ्या. बाहेर दंगा आहे फार. जरा मनातच लोळा. आकांत नका मांडू एकांताचा. तीर्थच ठेवा ना उशाला! रात्र टाका पायथ्याला. तीर्थ घ्या. तीर् घ्या.....

कोणी राहत नाही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 03/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जाती जन्मतात. जाती शाळेत जातात. जाती प्रौढ़ होतात. जाती जातीशी(च) लग्न करतात. जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री आपल्याच जातीवर चढ़तात. मग अशा रीतीने जाती ..पुन्हा कंटीन्यू होतात. जाती गावा.बाहेरच्या 'म्हारवाड्याला' असतात. --- जाती शहरा.बाहेच्या 'झोपड़पट्टीलाही' असतात. जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात. जाती गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात. जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात. जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात. मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात. नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात. जाती रक्षणाला असतात, जाती आरक्षणाला असतात. जाती निवडणुकीला असतात.

चाहुल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 03/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चाहुल- डोळ्यांत श्रुंगार भरताना, सौभाग्याचं लेणं लेताना, भरजरी शालू सैरभर नजर हिरवा चुडा जरीचा पदर फुललेला तिथेच असेल कुठेतरी मी नि:शब्द आणि गहिवरलेला... . . उत्फुल्लं- भरत्या सागरास पाहताना, आहोटिला चंद्र वाहताना, चमचम मोती अवखळ किनारा भरली मासोळी वादळी वारा सुटलेला. तिथेच असेल कुठेतरी मी तुझ्याच प्रितीत रमलेला... . . भणंग- आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना, मागे वळून पाहताना, पहाटेचा सडा बाभळीच झाडं उजाड माळरान पाण्याचा माठ भरलेला. तिथेच असेन मी कुठेतरी, तुझ्याचसाठी हरवलेला...
काव्यरस

'स्थितप्रज्ञ'

लेखक एस यांनी बुधवार, 02/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या दोरीला बांधत अजून एका शतकाची गाठ स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात अजून किती जगशील तू? तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी की काळाची? अन् मग संवेदना बधीर करत भिनेल ते विष हळूहळू सर्वांगात? जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या साक्ष देती कशा आजही कैक पावसाळ्यांच्या अन् तख्तपालटांच्या! त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण पेरते का रे आजही तेच विचार तुझ्याकडे कधीकधी वळणार्‍या नजरांमध्ये? की विझते आजही धुमसती संघर्षाची धुनी तुझ्या स्फूर्तीने? आलाय वाटतं जवळ तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट ते पहा, मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय कधीच ओसाड पडलेलं हे शहर येताहे
काव्यरस

सलामी

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 31/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी, कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती, कसली तुझी ती आठवणींची नाती, मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती. नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला, ही एक माजुरडी सलामी होती. मी उदास होतो, हताश होतो, निष्प्रभ प्रांगणात , माझे दु:ख उगाळून घेतो. तुझ्या डोळ्यांतील चांदणे, मी टिपांत गाळून टाकतो. चाललेल्या या विषण्ण तपाला, ही एक टोचरी सलामी देतो. तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे, घरादारात हुंदडत राहो. तुझ्या अल्लड रातींची पाखरे, आभाळभर उडत राहो. तुझ्या वैराग्याच्या खपल्या, रानोमाळी झरून जावो. येणाऱ्या आव्हानी तपांना, ही सलामी जिव्हारी जावो.
काव्यरस

नियती

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मागते काहीं रखरखाट तप्त कुठेसा त्या रस्त्यावरती ओला तो थेंब शुष्क रुधिराचा भिरभिरति नकळत डोळे शोधी आधार छताचा ते खांब चारच होते ना मागमुस भिंतीचा सुकलेल्या ओष्ठांना हलके स्पर्श तप्त अश्रुंचा थांबले गालांवर मोती ओघळला श्वास कोरडासा त्या श्वासांमधले अंतर मोजण्यापल्याड असते मी फ़क्त मोजतो श्वास अन्तरही फसवे असते जगणे बुभुक्षिताचे भूक संपता संपत नाही ते स्वप्न शोषिती माझे शोधती सत्य आभासी ते दिवे दूर जाताना सावली सोडते साथ बांधू पाहतो नशिबा पाठीवर बांधुनी हात ते दिवस कोडगे होते रात्री लाजिरवाण्या स्वप्नांचे इमले इतुके विश्वास बाटगा होता ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगं
काव्यरस

बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 21/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला ! नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको, माझा नंबर पह्यला ! बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला ! शंका काढलीस तर आरोप करेन जखमी असशील तर दोष तुझाच धरेन माझा नंबर पह्यला ! बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला एक माझे अन शांती मिळव माझा नंबर पह्यला ! सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला बातमीत येईन, सत्ता घेईन सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर माझा नंबर पह्यला ! बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

बहर

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस गारवा संध्याकाळ निवांतपणा गुलजार-बिलजार सगळं आहे . . . . कागद मात्र....कधीचा कोरा काही शब्द एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स तडफड थोडीशी भिती जमणार आहे की नाही? पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा छ्या... तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?
काव्यरस