अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी,
कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती,
कसली तुझी ती आठवणींची नाती,
मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती.
नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला,
ही एक माजुरडी सलामी होती.
मी उदास होतो, हताश होतो,
निष्प्रभ प्रांगणात ,
माझे दु:ख उगाळून घेतो.
तुझ्या डोळ्यांतील चांदणे,
मी टिपांत गाळून टाकतो.
चाललेल्या या विषण्ण तपाला,
ही एक टोचरी सलामी देतो.
तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे,
घरादारात हुंदडत राहो.
तुझ्या अल्लड रातींची पाखरे,
आभाळभर उडत राहो.
तुझ्या वैराग्याच्या खपल्या,
रानोमाळी झरून जावो.
येणाऱ्या आव्हानी तपांना,
ही सलामी जिव्हारी जावो.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2808
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेल, वेल, वेल! भारी आहे ही
धन्यवाद स्वॅप्स...!! :)
In reply to वेल, वेल, वेल! भारी आहे ही by एस
मस्तच
थैक्स...!
In reply to मस्तच by एक एकटा एकटाच
आवडली कविता. :)
नोप्स, राग कशाला मानू हो..!
In reply to आवडली कविता. :) by रातराणी
वाह !
मिपाकरानी