Skip to main content

मुक्त कविता

विषय

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले, पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले, हे शिकून तरी काय कळले, आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले, ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले. भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण, विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण, ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन, त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून. विज्ञानाच्या तासाला,न्यूटनचे नियम सतत रटत गेलो, प्रत्येकाच्या क्रियेला,सडेतोड प्रतिक्रिया आयुष्यभर देत गेलो, शब्दांच्या जाळ्यात स्वतःला खोल फसवत गेलो, विचारु कुणाल, दुरावस्थेला माझ्या मीच जबाबदार बनत गेलो. मग न्यूटनच म्हणाला नियम

पुण्यात...

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 28/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य

सासुरवाशीण

लेखक मीनादि यांनी गुरुवार, 25/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
झालेय आता सासुरवाशीण तरी आई तुझ्याकडे यायचंय आई तुझ्याकडे यायचंय , मला परत लहान व्हायचंय नाही सहन होत ग आता जबाबदारीच ओझ तुझ्या कुशीत शिरून मला खूप खूप रडायचंय नाही इथे कुणालाच माझ ऐकायचंय मनात साठलेलं तुलाच फक्त सांगायचंय पुन्हा तुझी आळशी मुलगी मला बनायचंय पुन्हा मला उशिरा पर्यंत लोळायचय तुझ्या हातच गरमगरम जेवायचंय इथे कुणाला माहीतही नाही मला काय आवडत, सासुरवाशिणी साठी नसतो हा नियम जाणलंय मी तरीही आई मला तुझ्याकडे यायचंय मला तुझ्याकडे यायचंय आई, मला पुन्हा लहान व्हायचंय . होईल का ग हे शक्य नाही ना !!!!
काव्यरस

योद्धा

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 20/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एक योद्धा होता तो शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा जो हात तो धरायचा त्या मनगटांमधे जोर यायचा जो माणूस तो जोडायचा तो पोलादी होऊन जायचा हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला ईतकं की पुढे दोनेक पिढ्या पेटत राहिले होते ते निखारे त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले उलट जे हात पसरत होते त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं आणि त्याची माणसं ?
काव्यरस

अपूर्ण कविता .....

लेखक मयुरMK यांनी बुधवार, 10/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
येण्यास जन्मा थोडा उशीर झाला अन जीवनी सगळाच गोंधळ झाला ! उशीर का झाला ? गोंधळ का झाला ? पूर्वजन्मीच्या जीवनाच्या जगण्याचा करता करता हिशोब पाप-पुण्याचा शोधताना चुका मागच्या जन्मांच्या वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला....! आता हिशेबात चुका नाहीत करायच्या असा प्रामाणिक निश्चय मनाशीच केला - मंदिरात जायला थोडा उशीर झाला अन मंदिराचा दरवाजाच बंद झाला ! उशीर का झाला ? दरवाजा बंद का झाला ? देवाच्या देवळात जाताना देवपुजेआधी माझ्यासाठी व माझ्याच स्वकियांसाठी काय मागावे ,काय नको ?
काव्यरस

अस्तित्वाची बोंब

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 08/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

घरात जरा उदासच वाटलं

लेखक अन्नू यांनी रविवार, 07/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले...

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 07/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )
काव्यरस

स्त्री - काल आणि आज

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 04/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी चार भिंतींमध्ये जखडलेली स्त्री होती. रांधा वाढा उष्टे काढा आयुष्य ती जगत होती. कावळा तिला शिवत होता चार दिवसाची हक्काची सुट्टी तिला मिळत होती. स्त्री आज स्वतंत्र आहे घरा बाहेर पडली आहे. ऑफिसात जात आहे धंधा हि पाहत आहे. मुलांना शिकवत आहे स्वैपाक हि करीत आहे. थकलेल्या शरीराने अहोरात्र खटत आहे. कावळा आज शिवत नाही हक्काची चार दिवसाची सुट्टी हि मिळत नाही.
काव्यरस

राहील कुठे आता ही चिमणी?

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 28/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६