Skip to main content

मुक्त कविता

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

ठिकऱ्या

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 13/10/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री रस्त्यावर चालताना समुद्र माझ्या ओंजळीत लपला. उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला. काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली. आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली. हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या. ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या. कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला नकळत माझ्या मुठीतून, विश्वातला एक थेंब रस्ताभर पाझरु लागला काळोखातला सुर्य अंधार चिरडत पेटत गेला कित्येक चकोर चांदण्या ऊधानून चमकत निसटुन गेल्या अवकाशाच्या निर्वातात एका ठिणगीच्या ठिकऱ्या झाल्या.
काव्यरस

नटरंग

लेखक एच्टूओ यांनी मंगळवार, 13/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नटराजा तुझी सोडून मी कधीच दुसऱ्या कशाची  उपासना केली नाही.. पण माझ्या प्राक्तनात आले स्मशानवत बैरागी भोग आणि टाळ्या घेण्याच्या मस्तीची शकले उडून दूरवर जाऊन पडली.. भयावेगात मी जाळून टाकल्या उर्मी आविष्काराच्या आणि ती राख सावडत अश्रू ढाळत बसतो सध्या.. तुझ्या अधिष्ठानाबद्दल कधीच शंका नव्हती मनात माझ्या पण गलितगात्रतेच्या विचारांची धार फोडत गेली माझा निर्धार आणि मी थंडपणे बंद केल्या तुझ्या जाणिवांच्या आकर्षक वाटा तुझ्यापेक्षा मोठे तुझे वेड-पण चौथ्या भिंतीपलिकडे बसलेल्या भेसूर दुःस्वप्नांना मी घाबरतो.. आता रिकाम्या हातांमध्ये बांधून मणाच्या वजनाचे दगड, खुरडतो आहे ठराविक चाकोरीत.. हे
काव्यरस

माझे आकाश...

लेखक बन्या बापु यांनी सोमवार, 12/10/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलझार यांच्या एका मुक्ताकावरून भारावून काहीबाही सुचलेले..) शाळेतून येताना चिंचोक्या सोबत लपवला होता आकाशाचा एक तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... लाल हिरव्या तांबड्या लोलंकात हरावयाचा तो कधी.. कधी चोरकप्यात लपून बसायचा.. अंधारात चांदण्याचा प्रकाश शोधून देत असे मला.. माझा आकाशाचा तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... सोबत जगत आलो आम्ही दोघे.. लोलकांच्या प्रकाशात ... सोबत स्वप्नं बघत आलो आम्ही... परीची.. तार्याची.. आकाशाची.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... भरून यायचा आभाळ.. भिजायची पुस्तके माझी..
काव्यरस

सुखद श्रावणसरी

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,, व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात.. आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी, भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात , व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात.. पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
काव्यरस

दयेच्या छावण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/10/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

जमलंच तूला तर....!!

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
जमलंच तुला...... तर जमलंच तुला...... तर करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील नाहीतर उगाच लोक बड़बड़तील काहीही अन कुठेही ? जमलंच तुला...... तर कान फूंक त्या बलातकाय्रांचे दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं ! एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा ना गंध, ना वास! फूल आहे, तेवढा भास ! जमलंच तुला......

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:11 या दिवशी प्रकाशित केले.

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

म्हणता म्हणता ......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/10/2015 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच नाही म्हणता म्हणता चंद्राभवती पडले खळे, खळेच पडले इतके सुंदर चंद्र दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता चाफ्याभवती पान उमटले पानच इतके गर्भरेशमी, फूल दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता बागेभवती जडली माया माया इतकी गर्दसावळी बाग दिसेना त्यानंतर! काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....