मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोणी राहत नाही...

अर्थहीन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जाती जन्मतात. जाती शाळेत जातात. जाती प्रौढ़ होतात. जाती जातीशी(च) लग्न करतात. जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री आपल्याच जातीवर चढ़तात. मग अशा रीतीने जाती ..पुन्हा कंटीन्यू होतात. जाती गावा.बाहेरच्या 'म्हारवाड्याला' असतात. --- जाती शहरा.बाहेच्या 'झोपड़पट्टीलाही' असतात. जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात. जाती गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात. जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात. जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात. मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात. नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात. जाती रक्षणाला असतात, जाती आरक्षणाला असतात. जाती निवडणुकीला असतात. जाती 10विच्या दाखल्याला अन आताच्या जनगणनेलाही असतात. जाती ॐ, अर्धचंद्र, क्रॉसला असतात जाती गीता कुराण बायबललही असतात. जाती शरीरालाही असतात. त्याआधी जाती 'मनाला' असतात. जात आर.एस.एस.ला आहे, जात MIMला आहे, जात सेनेला आहे, जात पुरंदरेला आहे, पाटीदार पटेलाना आहे, रेल्वे रुळावर झोपलेल्या गुज्जर , खच्चर अन मराठ्यांना आहे. या धर्मनिरपेक्ष देशाच्या ..रक्ता-रक्तातुन हल्ली,, ......हा अदृश्य जातीभेद ...........अखंड-अखंड वाहत असतो. . . . . मग इथं जात कोणाला नाही?? तर ती फ़क्त 'भारताला' नाही. पण त्यात आता कोणी राहत नाही.

वाचने 2906 वाचनखूण प्रतिक्रिया 14

माम्लेदारचा पन्खा 03/09/2015 - 22:31
वरचा क्लास !!