Skip to main content

चाहुल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 03/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चाहुल- डोळ्यांत श्रुंगार भरताना, सौभाग्याचं लेणं लेताना, भरजरी शालू सैरभर नजर हिरवा चुडा जरीचा पदर फुललेला तिथेच असेल कुठेतरी मी नि:शब्द आणि गहिवरलेला... . . उत्फुल्लं- भरत्या सागरास पाहताना, आहोटिला चंद्र वाहताना, चमचम मोती अवखळ किनारा भरली मासोळी वादळी वारा सुटलेला. तिथेच असेल कुठेतरी मी तुझ्याच प्रितीत रमलेला... . . भणंग- आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना, मागे वळून पाहताना, पहाटेचा सडा बाभळीच झाडं उजाड माळरान पाण्याचा माठ भरलेला. तिथेच असेन मी कुठेतरी, तुझ्याचसाठी हरवलेला...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2452
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुंदर आहे! फक्त, 'असेल' च्या ऐवजी 'असेन' हा शब्द हवा होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो बरोबर.. 'असेन' पाहिजे होतं पहिल्या दोन कडव्यांतही. अनवधाने झालं बहुतेक.