Skip to main content

मुक्त कविता

कविता कुणाची? - एक जोड - बेजोड प्रयोग

लेखक निनाव यांनी सोमवार, 21/12/2015 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी. कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून. हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी. विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :) कविता कुणाची कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून अमृत स्वरूपात आलेली ती कविता कुणाची? त्या कवीची ? कि त्या बोरू ची ? कि असेल ती त्या कागदाची ? कि त्या वेड्या कला प्रेमीची जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो प्रेम करतो - निरागस - स्वैर कविता कुणाची ?

सॅचुरेशन पॉइंट

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 16/12/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक सूर्य चांदण्या रात्री संथ जलाशयात खड़े मारत बसलेला दिसला 'रस्ता चुकलायस का मित्रा?' त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले म्हणाला ... कंटाळा आला राव ! रोज रोज पूर्वेकडे उगवायचं स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं.. रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु ते काय म्हणता तुम्ही? संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा काहीतरी नवीन.. काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा एखादी हळुवार कविता ऐकावी एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं अगदीच काही नाही तर गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी आणि मग... शांतपणे पाण्यावर उठणारे तरंग पाहात बसला एक विलक्षण शांतता.. वाऱ्याची नाजुकशी सळसळ अचानक कुठुनतरी पाखरांची किलबिल कानी आली

माझ्याच श्वासांनी

लेखक मयुरMK यांनी सोमवार, 14/12/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी - जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे? आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी मलाच मारायचे योजिले या सार्‍यांनी सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
काव्यरस

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 11/12/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ================

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

साकल्यसूक्त

लेखक मितान यांनी शनिवार, 05/12/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

अरे या ना रे

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 01/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ना सांज ना सकाळ, सगळा अंधारच अंधार आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा ना अंधरुन ना रजाई ना उतरण ना चढाई आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे जळतच गेली जळत जळत गेली दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी नाही विझली नाही विझली हवेनेही नाही विझली ही जिंदगी एक फुंकर मारली सगळा धूर ऊडून गेला तो श्वास होता, एक ध्यास होता जो घेऊन गेला, सत्यानाश होता मायेच्या काळजाचा एक नाद होता अरे या ना रे ============================ सौजन्य:
काव्यरस

एल्गार स्वरांचा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 01/12/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा पाखरे अशी येतात कुठून येथे साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा जगतानाच त्यांनी जाळले मला इथे मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा #जिप्सी
काव्यरस

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

मुमुक्षु

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 01/12/2015 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर मुमुक्षु राहतो. रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर. ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन हल्ला करतात अचानक दिसेल तिथे अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू. मुमुक्षु.
काव्यरस