Skip to main content

मुक्त कविता

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 05/05/2016 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?

मन

लेखक पथिक यांनी गुरुवार, 28/04/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
मन धावून धावून जातं आणि बिलगतं - पानाफुलांना, वृक्षवेलींना, रानवाटांना, डोंगरदऱ्यांना. मन पंख उघडतं आणि झेपावतं त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात; आणि तरंगत, उमलत राहतं एखाद्या शुभ्र मेघासारखं. मन चांदण्यात जाऊन बसतं आणि अबोल रात्रीला पुसतं तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं. मन वहिवाट सोडतं आणि निघतं त्या वाटेने ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत, दिशा आणि देशांचे फलक नाहीत; जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !
काव्यरस

-स

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ओल्या केसांचा गंध करीत नाही मला धुंद- शॅम्पू का बरे लावतेस? तुझे डोळे तसे अगदी गहिरे वगैरे आहेत- लेन्सेस का वापरतेस? तुझ्या ओठांची लाली थोडी कडू बघ लागते- लिपस्टिक कसलं लावतेस? तुझ्या गोब-या गालांना कुस्करणं मला आवडतं- त्यांना क्रीम का फासतेस? कितीदा तुला सांगितले नटू नकोस उगाचच तू- अशीच मला आवडतेस!
काव्यरस

प्राजक्त

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 05/04/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . विशाल कुलकर्णी
काव्यरस

आम्ही मनमौजी

लेखक सुधीरन यांनी शनिवार, 02/04/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला वसंत ऋतु आला नाचुया खेळूया झूला झुलूया आम्ही सारे आहो मनमौजी मजेत आपण सारे फिरुया ।।१।। कशास बाळगू तमा जगाची कशास काळजी आज उद्याची दिवस हा आजचा मजेचा रात्र ही धुंद नशेची ।।२।। तरुण आम्ही नव्या युगाचे भोक्ते सा-या सुखांचे नका पाडू बंधनात आम्हा आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।। कमी पडेल धरती ही थिटे पडेल आकाश ही मनात आणता आम्ही रूप पालटू या जगाचे ।।४।।

शक्तिपात

लेखक एच्टूओ यांनी बुधवार, 30/03/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी मी डॉक्टरकडे गेल्यावर अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा खदाखदा हसला डॉक्टर आणि बाहेर घेऊन गेला मला तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये हवा भरलेल्या फुग्यासारखा आभाळभर मेंदूच- लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट तरीही जड वाटेना मला.
काव्यरस

माहेर वारी

लेखक त्रिपुरा यांनी मंगळवार, 29/03/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
पोचता पोचता उंबऱ्याशी माहेरच्या, मनाच्या अंगणात पडतो आठवणींचा सडा नव्याने अनुभवताना सवयीची माया नकळत जातात भिजून, पापण्यांच्या कडा परत परत लागतात शोधावे, 'माझ्या' कपाटात सजलेले अनोळखी खण जुनाट फोटोत डोकावणारे सवंगडी आठवतात नुसतेच बनून 'काही' जण मायेच्या ऊन ऊन घासांत, न शोधताच सापडते अमृताची चव कौतुकानं लावलेल्या वेलीवर जुईच्या, हवं तेव्हा चमकतं, लबाड दवं गप्पांच्या फडात लावतात हजेरी, हव्या - नकोशा नात्यांचे बेमालूम पाश पायाखालच्या रस्त्यात खुणेला मिळतं, चिमुकल्या डोळ्यांनी साठवलेलं हक्काचं आकाश दरवेळी घेणं माहेराचा निरोप, नव्यानं भासतो, नावराईच्या पाठवणीइतकाच कठीण बांधून आसवं, निघायचं हसत
काव्यरस

<"ऊभारू का पण डु आय्डी">

लेखक नाखु यांनी सोमवार, 28/03/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

लेखक नाखु यांनी मंगळवार, 22/03/2016 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. .........

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .