एक योद्धा होता तो
शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा
जो हात तो धरायचा
त्या मनगटांमधे जोर यायचा
जो माणूस तो जोडायचा
तो पोलादी होऊन जायचा
हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला
ईतकं की पुढे दोनेक पिढ्या
पेटत राहिले होते ते निखारे
त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ
त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे
त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले
उलट जे हात पसरत होते
त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं
की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही
त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं
त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं
आणि त्याची माणसं ? काय कमी पराक्रमी होती ती ?
त्याच्या एका शब्दावर वाटेल तिथे झोकून देत होती स्वतःला
एकएक माणूस म्हणजे आख्खं सैन्यच जणू
अहर्निश कष्ट करून त्याने घडवली होती ती कणखर मने
फार नाही, तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच केली होती त्याने ही मशागत
तो असा काही भरून राहिलाय ईथल्या द-याखो-यात, दगडामातीत
की त्याच्या नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरतात आमचे
आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते अभिमानाने आमची
.
.
.
.
.
.
काल आम्ही म्हणे शिवनेरीवर त्याची जयंती साजरी केली
काल आम्ही म्हणे त्याच्या मावळ्यांना आरक्षण देऊ केलं
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4112
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचा आहे तो...सांगताना छाती
कळलं नाही
In reply to आमचा आहे तो...सांगताना छाती by टवाळ कार्टा
मतितार्थ
In reply to कळलं नाही by चाणक्य
ओह
In reply to मतितार्थ by प्रचेतस
हायला...इतक्यात बदलायला पण
In reply to ओह by चाणक्य
तुम्ही पण संपादकांकडून 'वी'
In reply to हायला...इतक्यात बदलायला पण by टवाळ कार्टा
हाहा
In reply to हायला...इतक्यात बदलायला पण by टवाळ कार्टा
कविता आवडली...
In reply to आमचा आहे तो...सांगताना छाती by टवाळ कार्टा
खूपच सुरेख.
चाणक्य इज बॅक
सुरेख कविता.
समयोचित
सुंदर कविता ! मोठ्या
सुरेख कविता.
चांगली आहे आवडली
सुरेख कविता.
कवीता आवडली
+१
In reply to कवीता आवडली by नाखु
जबराट..
ज्जे बात