मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राजक्त

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . विशाल कुलकर्णी

वाचने 2667 वाचनखूण प्रतिक्रिया 14

पैसा 05/04/2016 - 11:21
अहा! उन्हाळ्याच्या तलखीत एकदम थंड वाटलं!

नाखु 05/04/2016 - 11:45
विशाल्याला चोपा रे कूणी तरी !!! जीवघेण्या कवीता रचून राहलाय !! मिपावच्या कडक उन्हाळी धाद्यातही झुळकीने हरकलेला नाखु

अमृता_जोशी 06/04/2016 - 23:25
नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी
कातिल..

निशदे 06/04/2016 - 23:49
सुंदर......... ""इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . "" इथे कवितेने कळस गाठला.........

मिसळलेला काव्यप्रेमी 26/04/2016 - 17:06
अतिशय सुंदर रचना...