शक्तिपात
लेखनविषय:
काव्यरस
फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा
खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.
अचनाक फुटून मेंदू
त्यातून वहायला लागले लोंढ्यासारखे
सगळे इझम्स,वाद,मंडन,खंडन,
तण्डन,तत्व,धर्म,बीर्म,कर्म,
वर्म,मर्म,इत्यादि इत्यादि -काळ्याशार रंगाचे
जुनाट गटारयुक्त दर्पावासाचे
त्या दर्पाने मळमळून मी ओकलो रक्त
पण डॉक्टर हसतोय खदाखदा वेड्यासारखा
मी चिडून बोलण्याचा प्रयत्न केला,
पण बोलता येतय कुठे?
अगतिकतेने ओकत राहिलो रक्त अविरत
आणि डॉक्टर पोहत-वाहत राहिला
रक्त आणि गटारांच्या संमिश्र द्रवात.
मेंदू अजून वाढतोच आहे
आता मात्र जाणवतय ओझ
डॉक्टर मात्र केव्हाच गेलाय वाहून
वाचने
2260
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अत्यंत ओंगळ काव्य
In reply to अत्यंत ओंगळ काव्य by विवेक ठाकूर
अगदी अगदी :)
एकदम फर्मास
In reply to एकदम फर्मास by स्पा
त्रास समजून घेतल्याबद्दल खूप
अगदी धार्पांची कथाच
In reply to अगदी धार्पांची कथाच by भाऊंचे भाऊ
संदर्भ समजला नाही. थोडं
...
In reply to ... by lgodbole
धन्यवाद :)
माझ्या आकलनक्षमतेचे संकुचित
In reply to माझ्या आकलनक्षमतेचे संकुचित by वेल्लाभट
:)
भेजा फ्राय!
In reply to भेजा फ्राय! by मम्बाजी सर्वज्ञ
:)