Skip to main content

कविता माझी

अस्त

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 07/05/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिसांची चहू चिंतने भ्रमितपणाची बहू लक्षणे विषासम त्या प्रवासातले क्षणिक गोडवे अस्त पावले अनाठाई त्या रूचक चिंता स्वप् नसुखांच्या रजई विणता सूर निराळे गवसण्यापरी तारेवरचा नवा डोंबारी नको म्हणाया धजते ना मन धडगत नाही रीते रीते पण बेधुंदपणाचि सूटली आवड दिनपणाचि जूडली कावड क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा नको जपाया स्वप्नांच्या लाटा अधांतरी क्षितिजाच्या मागे विझून गेले लख्ख पोरगे
काव्यरस

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 05/04/2020 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.

(वळण)

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

मास्कमधून

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 22/03/2020 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
काव्यरस

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

माय मराठी

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 27/02/2020 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचा बोलण्यात गोडवा शब्द जणू शीतल हवेचा गारवा बोली भाषेची गोष्टच न्यारी जणू तुळस आपल्या दारी बारा कोसाला भाषा बदलते माय मराठी सर्वांना जोडते संतांनी गायिले मराठीचे रंग रूप अलंकारांनी नटले सोज्वळ स्वरूप प्राण मराठी जाण मराठी उल्हास मराठी महाराष्ट्राचा ज्वाजल्य अभिमान मराठी माय मराठी आम्हा सर्वांचीच आई सगळ्या लेकरांना अलगद कवेत घेई मराठी अस्मिता मराठी मान मराठी शान मराठी म्हणजे शब्द अनं आभूषणाची खाण मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
काव्यरस

ग चांदण्यांनो

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 24/02/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नका ग चांदण्यांनो नका येऊ खिडकीत तिच्या मनाचा ठाव सांगा येऊन पडवीत सांगा तिच्या गाण्यात का, आहे नाव माझे? माझ्याविन विरहाचे का, सोसते ती ओझे? ठावे तिलाही आहे का, रात्री कवितांचे येती जथ्थे, जाती स्वप्न गाऊन उद्याचे? आतूर प्रीत आत रोज झुरते उरात सांगा तिला हे सारे चमचमत्या सुरात तिचे चालणे बोलणे भास होऊन छळते लय श्वासांची तेव्हा आठवांशी अडखळते सारे आठव आठव युगांच्या जणू फेऱ्या रेखू पाहती नशीबाला तळहातावर कोऱ्या पसा पसा सुखाचा तिला देईन मोजून बघा चांदणझुल्याचे झोके रितेच अजून जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे - संदीप चांदणे (२४/०२/२०१९)

एकदाच ओलांडून अंतर...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 12/02/2020 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...
काव्यरस

Whatsapp Romantic Shayari

लेखक तृप्ति २३ यांनी शनिवार, 28/12/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari
काव्यरस

प्रसन्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/12/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ते विस्मृत गाणे धूसर होऊन विरून जाते पण नेणीवेच्या अथांग डोही अवचित दिसते मग पुन्हा गीत ते शब्दांच्याही पल्याड नेते अन् नकळत अश्रु झरताना ओठांवर येते मग पुन्हा पुन्हा मी घाव सोसुनी लढत राहतो अन् कितीही हरलो तरी खळाळून प्रसन्न हसतो
काव्यरस