मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पानी आनाया जावू कशी

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२|| दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई चार्‍यापायी गाय गेली, गोर्‍ह्याला कशी टाकू ग पेंढी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||३|| बायकांचं जीनं आबरूचं कोनी नाही तिला वाली ग बकरू मोठं केलं अन विकलं जसं खाटकाला ग दुश्काळानं मढं केलं उपेग काय घेवून फाशी मी पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||४|| पुर्वप्रकाशित - पाषाणभेद

वाचने 1524 वाचनखूण प्रतिक्रिया 4