मोहोळ
आठवणींचं मोहोळ
आज फुटलं फिरुन
सयी छळती जीवाला
डंख मारुन मारुन
जखमा जुन्या पुराण्या
पुन्हा नव्याने सलती
भळाभळा लागे वाहू
जरी खपली वरती
कधी आसूड शब्दांचे
गेले कातडी सोलून
कधी कुणी फसविले
गळा केसाने कापून
घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयर्याचे वार
सार्या कटू आठवांचे
येई मळभ दाटून
होई चित्त सैरभैर
राही काळोख भरुन
ओझे झाले पापण्यांना
काळ्या सावळ्या ढगांचे
कोसळे झडझडून
मन ऋणी आसवांचे
जयश्री
वाचने
1663
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
आवडेश
ओझे झाले पापण्यांना काळ्या
भावस्पर्शी काव्य
जयवी जी , अतिशय आशयघन कविता आहे.
In reply to जयवी जी , अतिशय आशयघन कविता आहे. by निश
सुंदर कविता आणि सुंदर निश
मनापासून धन्यवाद
मस्त !
धन्यु परा