भूकंप....!
लेखनविषय:
काव्यरस
आज खूप दिसांनी
पुन्हा त्या वास्तूत आलु,
पडक्या पांढरीच्या इटा बघून
काळूखात त्या हरवून गेलू !!
माती सारता हातांनी
डोळं उघडं निर्जीव धूड,
नवलाईत सगळं डोळं
वासं झोपल्याचं त्यात गूढ !!
वाटतंय राहून राहून मना
माती कृतघ्न नसावी झाली,
आखीरपर्यंत आसंल थरथरली
जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !!
या मातीतच वलावा उभारा
त्यावर निर्धास्त सोडला पसारा,
दोन चिमुकली फळे संसारा
झोपली गार ओढून ढिगारा !!
दैव घालाच तिथं वास्तूचं काय ?
बायको मुलांसंगती कारभारी जाय,
पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं
समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !!
डोळ्यांतल्या पाण्याबरोबर
पांढरी माय चमकत हुती,
पाणी साचल्या डवंग्यात मातुर
पानकणसं तुरयात हुती !!
येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा
ओकू कि पिवू त्याला आता,
धैर्य बळ वृधत्वाशी विरघळता
कंप सुटे उभे राहता !!
श्री. साजीद यासीन पठाण
वाचने
1532
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
***
***
साजिद भाई,
कवीता आवड्ली...
In reply to कवीता आवड्ली... by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
+++१११
In reply to कवीता आवड्ली... by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
काळजातुन हलवणारी कविता
दोन चिमुकली फळे संसारा
सुरेख