Skip to main content

भाकरीचा चंद्र ....

लेखक psajid यांनी सोमवार, 11/11/2013 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
गरवेलाच छप्पर चिखलाच खापर, शमवावी तहान त्यांनी पिऊन मळकं पाणी ...... व्यापारी दुनिया व्यावहारिक माया, न्याहळतोय जरी तो उघडेना आपली वाणी ...... जगण्याला काय मोल हिथं नाय, सावकाराचा भार डोई व्याजाची गोणी ...... जन्माचा वैताग भाकरीचा चंद्र माग, देतील प्रसाद कधीतरी अन हिरावतील कंठमणी ...... लढेन म्हणतोय विरुध्द पण साथ नाही शुद्ध, रस्ता दाखवतील सगळेच पण संगे चालेना कोणी ...... श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2026
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया