माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते.
त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
मळभ खळे ना श्वास दाटले मेघांनी,….
खळबळले, ढवळल्या कथा पुनवेस उसवल्या लाटांनी
अंदाज कसे चुकले बावरले ऋतू कोंडल्या वाऱ्यांनी
आभाळ कडे कोसळले कढ झेलले पोरक्या हातांनी
कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, …
मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी
थरथरले नभ सहवास नि माया मूढ जाहली काया
धावले जीव परतले रिते भिजवीत चंदनी छाया
…………………… अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3033
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__!!
आदराजली !!
आदरांजली!!
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि....
_/\_..............
अज्ञातकुल,
+१
_/\_
अज्ञातकुल,
आदरपूर्वक श्रद्धांजली