काहीच्या काही कविता
महिला दिन: काही कविता
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली. सर्व स्त्रियांची क्षमा मागून :
(1)
महिला दिनी बायको म्हणाली,
आज चहा तुम्हीच करा,
मी नाश्ता मागवते
स्विगीवरून जरा.
दुपारी आदेश दिला,
आज तुम्हीच भांडी घासा,
मी जेवण मागवते
झोमॅटोवरून जरा.
संध्याकाळी मी
कपडे सारे धुतले
तिने पिझ्झा मागविला
डॉमिनोजवरून जरा.
रात्री शेवटचा हुकूम दिला,
"आता तुम्ही बिछाना लावा..."
उर्जा चक्र
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार!
खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो. ही कविता जरा उशीराच टाकली गेली हे मान्य आहे.
आपण केलेल्या वारंवार आठवणीमुळे शेवटी ही कविता पाझरली आहे.
काव्याचा आनंद घ्यावा!
तांत्रिक विलोपन
स्पंदन संवेग विभव हे संचलन
स्थित्यंतर रोध प्रवेग प्रचालन
उत्सर्जन दाह जडत्व विलोपन
बीजकण न्यास संहती संरोपण
भूमिती रेख विन्यास परिमापन
वक्रीय भार का विरुपण मापन
पृष्ठभागावरी स्राव नि निक्षेपण
शृंखला सूत्र हे प्रगामी विलेपन
सणासुदीची सफाई
"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!
पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?
सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.
तसंच काहीसं —
मऊ मुलायम गादीसुद्धा,
खूप दिवसांनी कडक होते.
मग ती कारखान्यात जाऊन
सासुफ-करून, पुन्हा
मुलायम होते, स्वच्छ होते,
दिवाळी अंकांनी वैचारीक
कल्हई दिल्या सारखी.
जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे:
**पर्शियन आणि अरेबिक प्रेम:**
पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती,
अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित.
मोहक अदा, नजाकत खास,
प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास.
**उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:**
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
शब्दांची जादू, भावनांचा खेळ,
सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ.
**उर्दू आणि हिंदी प्रेम:**
'मिसळपाव' चा गदारोळ
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.
**कविता:**
**शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ**
चार भिडू डावे, उजवेही चार,
कुंपणाच्या वर, दोन भिडू फार.
भिडू भिडतात, त्वेषे परस्परा,
मौज ही इतरा, फुकटची जरा.
राजकारणाच्या व्यतिरिक्त काही,
घडतची नाही, देशात ह्याही.
ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती,
आता झाले अती, हौस फिटे किती.
अवांछित मजकूर, डोळे फिरवतो,
दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो.
मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा,
वाद-विवाद, विषय नानाच.
अभ्यासोनी मग ...
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
इंटरनेट हाती | असताना !
हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच
पुढच्यास ठेच | लागेना का
वायफळ मळे | पिकवू अमाप
काळाची झडप | येवो सुखे
प्रेषित
भौतिकशास्त्रातील जटिल भानगडींनी भंजाळून जायचो
तेव्हा आइन्स्टाईन एक अप्राप्य आदर्श
-नव्हे प्रेषितच- वाटायचा
मग एकदा
लोबाचेव्स्किच्या भन्नाट भूमितीने
युक्लीडच्या भारदस्त भूमितीला
जिथे फाट्यावर मारले
तिथे
अगदी तिथेच
पिंजारल्या पिकल्या केसांचा
मिश्किल म्हातारा उपटला.
म्हणाला," अरे ठोंब्या,
भौतिकीतील न्यूनत्व सावरणाऱ्या
सापेक्षतावादाची पुरेशी पुंजी
माझ्या गाठीशी असूनही
पुंजवाद पचनी पडलाच नाही माझ्या
अन् शिवाय
UFT(#)च्या गाठोड्याची गहन गाठ सोडवूच शकलो नाही शेवटपर्यंत"
पाऊस-कविता झाली पाडून
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)
मिसळपाव