!!फ्लश!!
काव्यरस
पेर्ना..! =))
प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते,
घुसायचीही मधे भलतीच तयारी असते,
जो मधे घुसला, तो धन्य होतो,
जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!
पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही,
आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही,
पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर,
तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !!
तशीच अशांची एक दुसरीही बाजू असते,
ती तुम्हाला स्वत:च्या नंब्रात हळुच्च पुढे सोडते,
तुम्ही लाख स्वत:च्या नंबरावर अडून "बसत" असला तरी,
ती अचानक तुमच्या नंबरावर खेळते !!
मित्रानो घुसायचं असं कुठलंच सूत्र नाही,
ह्हु: ह्हु: करत घुसायला ते कै गल्लीतलं कुत्रं नाही,
नंबर नाही मिळणार म्हणून जो चिडून डबडे फोडतो,
तो कधीच गच्चीत 'जायला' पात्र होत नाही !!
----------------------------
@पाणी आणव
(हुंबअअ् हुंबक.. हुक हुक! )
वाचन
15219
प्रतिक्रिया
0