उत्तर दे पण...
लेखनविषय:
काव्यरस
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून.
इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
* शेवटचं कडवं मूळ कवितेतील तसंच ठेवलंय.
उत्तर दे पण संदेशातुन
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये
कसा साठवू पाउस रिमझिम?
नको पाठवू इमोजीतले
लाजाळू अन् सुमुख हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.
नको पाठवू लाल चेहरे,
लटके रुसवे, रागही खोटे
समजुत काढुन मनवायाला
धावत यावे असेच वाटे.
नको पाठवू भिरभिरणारे
ओठांचे ते खट्याळ चंबू,
अशक्य आहे माहित तरीही
मनात वादळ, कसे थांबवू?
अधोमुख तू पाठवतो ते
हिरमुसले पण किती गोजिरे,
कळते सगळी गम्मत तरीही
जगणे होते सुखद साजिरे.
*पाठविशी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते,
त्या नंतर तू जे जे लिहिशी
वाचायाचे राहून जाते.....
वाचने
6895
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मूळ कविता
प्रयत्न आवडला
In reply to प्रयत्न आवडला by ज्ञानोबाचे पैजार
:):)
शब्दामधुनी नको पाठवू
In reply to शब्दामधुनी नको पाठवू by शानबा५१२
टोमणा पोचला हो:)
मस्त एकदम.
In reply to मस्त एकदम. by प्रचेतस
धन्यवाद!
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर!
सुंदर गुंफण झाली आहे,शेवट तोच
In reply to सुंदर गुंफण झाली आहे,शेवट तोच by Bhakti
वा!
छान!
In reply to छान! by श्रीगणेशा
अबोल्यातही सोबत असते .....
In reply to अबोल्यातही सोबत असते ..... by प्राची अश्विनी
Ingraji lipit lihilele मराठी
In reply to Ingraji lipit lihilele मराठी by श्रीगणेशा
ओह. ओके. :)
छान !
In reply to छान ! by हेमंतकुमार
धन्यवाद!:)
आवडली