मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अविश्वसनीय

बाई पलंगावर बसून होती

खिलजि ·
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

मी स्वप्न पाहत नाही

खिलजि ·
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ?

एकदा टारझन अंगात आला

खिलजि ·
लेखनविषय:
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

खिलजि ·
लेखनविषय:
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भि

( पुन्हा नोटा )

गबाळ्या ·
नोटा (चाल : गे मायभू तुझे मी) नोटा अनेक असती येती तुझ्याकडे त्या मी नोट शोधतो माझी परक्याच भासती साऱ्या दूरस्थ योजना* त्या खुणवी सदा मनाला मी गुंतवित जाता बुडतात घेऊनि मजला मागावयास जाता देती कुणी न काही नोटांनी भरले पाकिट मी स्वप्नी रोज ते पाही * योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

( काल रातीला सपान पडलं )

गबाळ्या ·
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

|| गुरु महिमा ||

गबाळ्या ·
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

नवकवीस्तोत्र

माम्लेदारचा पन्खा ·
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

(दे कुटाणे सोडुनी...)

खेडूत ·
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या' मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया ! एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको ***** पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली 'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली