कोसला

लेखनविषय:
काव्यरस
उगाच किंचीत धुगधुगलेला विस्कळीत अन विखुरलेला अस्ताव्यस्त भरकटलेला पंचविशीतला पालापाचोळा मी एक उदाहरणार्थ कोसला (अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

लेखनविषय:
काव्यरस
अनुवादीत लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं बोटं दाखवतील सोडलेल्या तुझ्या केसांकडे दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ पाहून थरथरत्या हाताला करतील काही खळखळ होऊन आततायी ताने देतील अनेक बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर समजून जातील पाहूनी छ्टा तुझ्या चेहर्‍यावर नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

काळ असा.......

[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!

राहील कुठे आता ही चिमणी?

वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

काव्यरस
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

यत्नशीलांची कधीही हार होत नाही

लेखनविषय:
काव्यरस
लाटांना घाबरून नौका पार होत नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही छोटीशी मुंगी दाणा घेऊन चालत असते चढते भींतींवर, शत शतदा घसरत असते मनातील विश्वास नसांत साहस भरतो चढून पडणे, पडून चढणे, व्यर्थ होत नाही अखेरीस तिची मेहनत वाया जात नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही पाणबुडे समुद्रात डुबकी घेत असतात खोलवर बुडी घेऊनही रिकामे परततात तिथे मोती सहज का सापडत नाहीत ह्या आश्चर्यानेच उत्साह दुप्पट होतो मूठ नेहमीच काही रिकामी राहत नाही यत्नशीलांची कधीही हार होत नाही अपयश आव्हान आहे, स्वीकार करा काय कमी राहिली शोधा, सुधार करा यश मिळत नाही, तोवर झोप सोडा संघर्षाचे क्षेत्र सोडून, तुम्ही पळू नका काही केल्यावि

अमृतप्याला

ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जावे वाटे घरी नकोसे हवे हवे ते जरी नकोसे विचार होती लाखो गोळा माझे असले तरी नकोसे इथेच बसुनि राहिन आता जलाशयाच्या या काठाला बुडत्य
Subscribe to अनुवाद