मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोसला

संदीप-लेले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
उगाच किंचीत धुगधुगलेला विस्कळीत अन विखुरलेला अस्ताव्यस्त भरकटलेला पंचविशीतला पालापाचोळा मी एक उदाहरणार्थ कोसला (अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)

वाचने 2811 वाचनखूण प्रतिक्रिया 3

सतिश गावडे Tue, 05/09/2017 - 23:54
भावानुवाद की सार? अनुवाद = एका भाषेतला मजकूर शब्दशः दुसर्‍या भाषेत रुपांतरीत करणे नुकतेच आपण तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला परंतू ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा तुफान विनोदी अनुवाद वाचला. भावानुवाद - एखाद्या भाषेतील साहित्य शब्दशः दुसर्‍या भाषेत रुपांतरीत न करता ज्या भाषेत मुळ साहित्य रुपांतरीत करायचे आहे त्या भाषेच्या लकबी, ती भाषा बोलणार्‍या भाषिकांची संस्कृती आणि जीवनमान इत्यादी गोष्टींचा विचार करुन केलेले पुनर्लेखन. सुचना: चुकभुल देणे घेणे. माझ्या व्याख्या चुकीच्या असल्यास थंड डोक्याने सांगणे. स्वतःला ज्ञानी समजणार्‍या अतीशहाण्यांनी माझी अक्कल काढू नये.

In reply to by सतिश गावडे

संदीप-लेले Wed, 05/10/2017 - 18:19
( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा >>> याचसाठी केला होता अट्टाहास ! धन्यवाद ! भावानुवाद की सार? - सार, सारांश, गाभा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. भावानुवाद शब्द चुकला असावा, चूभूद्याघ्या. तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला ... तुफान विनोदी अनुवाद वाचला.>>> मला तरी काहीच तांत्रिक चूक दिसत नाही. लिहिताना विनोदी लिहायचा मानस नव्हता. तुम्हाला तुफान विनोदी वाटले ते अलाहिदा !