हस्तर कविता :- महायुती

लेखनविषय:
काव्यरस
हस्तर कविता :- महायुती महायुती करून काय फायदा झाला ? जर सरकार एकत्र स्थापन करायचे नव्हते तर निवडणूक का आले एकत्र लढ्याला ? एक दुसऱ्याचा जागा अडवायला ? युती नावाचा प्रकार केलाच का ? एक दुसऱ्याची मते लाटायला ? मजा येत होती ५ वर्षे भांडायला अफझलखान म्हणून एक दुसऱ्याचे उणे दुणे काढायला का आनंद झाला जनादेश झुगारायला संगीत खुर्ची खेळ खेळून मनोरंजन करायला शेतकरी लागले आसू ढाळायला आणि तुम्ही बस आपले आपले शपत विधी करायला

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

लेखनविषय:
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

ऑफिसात जाऊन आलो

ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

(दाराआडची आई)

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

वृद्धाश्रम

लेखनविषय:
वृद्धाश्रम आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं तीच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं ती निराश होती हतबल होती दाराकडे नजर रोखून वाट बघत होती काय चुकलं तिचं की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय सार काही मुलाला देऊन तिला मात्र अस जगावं लागतंय डोळ्यातले अश्रु ही तिचे काही वेळाने थांबून गेले पुण्य केलं की पाप हे तिला ही कळेनासे झाले म्हणुनच म्हणते की …….. नका रे मुलांनो वागु असे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणी नसे त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या उर्वरित आयुष्य त्यांना आनंदाने घालवु द्या ….. Trupti Sameer Tilloo Vrud

असाव कोणीतरी

आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

सालं, आज जीव कासावीस झालाय

लेखनविषय:
सालं, आज जीव कासावीस झालाय तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय आज मी पण एक बाप आहे पण खरं सांगू मित्रानो या देशात बाप होणं , श्राप आहे केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय त्यांना थोडंच ठाऊक होतं पुढे होणार आहे काय ? त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ? जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील बाराव्यानंतरही आणि भरणीलाही पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील बातम्

पुतळा म्हणजे....

लेखनविषय:
काव्यरस
पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन, नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन. पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण. पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन. पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन. पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण.. पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..

स्वराज्याचे शिलेदार

लेखनविषय:
काव्यरस
तोबरे भरुनी निघाले सारे स्वराज्याचे शिलेदार शिवशाहीचा घोष दुमदुमे मांडला झेंड्यांचा बाजार भगवे निघाले , नभी फडफडले उद्या निघतील हिरवे न लाल धर्मावरून पेटतो इथे जहालांसंगे मवाल जर द्याल इजाजत करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल धर्म वेगळे मान्य मलापण रक्त का साऱ्यांचे लाल ? भगवा मनात माझ्या भगवा तनात माझ्या सोनेरी तेज जो देई तो सूर्यही भगवा माझा सिद्धेश्वर विलास पाटणकर C

मुक्तपीठ

लेखनविषय:
काव्यरस
प्रवास खडतर, सापडेना वाट ती. वाटसरु नवे, हरदिवस भेटती. रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके, थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे. जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता, बाकी निसटून जाती एक सांधता साधता. वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे. स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे. विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा, भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा. भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा, निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा. वाटे द्यावे झुगारून सारे बंध. निखळून जावे साखळदंड. हुंदडणाऱ्या अल्लड मनास... मिळावे एक मुक्तपीठ....
Subscribe to अभय-काव्य