Skip to main content

स्वराज्याचे शिलेदार

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/02/2018 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

तोबरे भरुनी निघाले सारे

स्वराज्याचे शिलेदार

शिवशाहीचा घोष दुमदुमे

मांडला झेंड्यांचा बाजार

भगवे निघाले , नभी फडफडले

उद्या निघतील हिरवे न लाल

धर्मावरून पेटतो इथे

जहालांसंगे मवाल

जर द्याल इजाजत

करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल

धर्म वेगळे मान्य मलापण

रक्त का साऱ्यांचे लाल ?

भगवा मनात माझ्या

भगवा तनात माझ्या

सोनेरी तेज जो देई

तो सूर्यही भगवा माझा

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1487
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया