बुधा!

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 12:52 am

काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात!
तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली!

कथाविचार

[शतशब्दकथा स्पर्धा] शाळा

सटक's picture
सटक in स्पर्धा
6 Aug 2015 - 12:34 am

ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची?
श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो..
काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून...
त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची.
कोपर्यात बसून रडणार्या त्याला बाई समजावू लागल्या..हे बघ, शाळेचे काही नियम आहेत ते पाळायला नकोत का? वेताळे गुरुजींना कळले तर तुझे काही खरे नाही!
तुला आवडली की नाही ती मुलगी? "हो"! मग ती इथे यायला हवी की नाही? "हो"!
मग तिने वाड्यात हरवायला नको का???

[शतशब्दकथा स्पर्धा] देवकी

dadadarekar's picture
dadadarekar in स्पर्धा
6 Aug 2015 - 12:03 am

' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.

मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.

भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?

कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली !

दुसर्‍या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली ..

' ये रे माझ्या बाळा ! '

[शतशब्दकथा स्पर्धा]जगणं

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in स्पर्धा
5 Aug 2015 - 11:12 pm

सकाळीच लवकर उठलो. खबदाडीमधून किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं.रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती.

काल तो जमाव हातात काठ्या-दगड घेऊन मागे लागला होता.त्यांच्या हाती सापडलो असतो तर तिथेच ठेचलं असतं त्यांनी…. थोडीशी भूक लागली होती म्हणून एक पाव पळवला दुकानातून.

कुठूनसं आणलं गेलं होतं इथे... तो बरोबर असताना असं नव्हतं… हेच लोक माझ्यावर खूष असायचे. अर्थात तो काही सरळपणे देत नव्हताच मला.तो म्हणेल तसंच वागायचं…कंटाळलो सगळ्याला ….

पळून जावंसं वाटलं म्हणून पळालो…अजूनही पळतोय …पण जाऊ तरी कुठे?

आता तो भेटेल की नाही देव जाणे…

[शतशब्दकथा स्पर्धा] कातरवेळ

रातराणी's picture
रातराणी in स्पर्धा
5 Aug 2015 - 1:53 pm

अख्ख्या दिवसभरात तिची आवडती वेळ दिवेलागनीची. कातरवेळ. कधी रिकाम्या हाताने न येणारी. कधी कटू कधी गोड आठवणी सोबत आणणारी. कधी खूप त्रागा व्हायचा पण तरीही वाट पहायची रोजच. मैत्रीणच वाटायची तिला.

आजसुद्धा न चुकता आलीच संध्याकाळ. तशी हुरहूर होतीच आधीपासून. पण आज तिनं निर्धार केला,नाही सोडवत बसायचं कुठलाच गुंता. तिन्हीसांजेला सांगितलं, बाई आलीस तशी चार घटका बस पण आज काही तुझा पाहुणचार करायला मला वेळ नाही.

सांज म्हणाली.. "नवी मैत्रीण मिळाली वाटतं?"

"नाही आज तो येणार आहे भेटायला."

तशी खुदकन हसून म्हणते कशी, "जोडीन येतायत देवीच्या दर्शनाला?"

[शतशब्दकथा स्पर्धा] बॉक्सर

यमन's picture
यमन in स्पर्धा
5 Aug 2015 - 1:11 pm

हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा.
त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही .
बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता .
आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते .
पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती .

समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते .
आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो .

जोर का झटका धीरे से लगे

तुडतुडी's picture
तुडतुडी in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 1:02 pm

रस्त्यावरच्या कोपऱ्यावर अचानक ती त्याच्या समोर आली .गेल्यावेळच्या भेटी नंतर आज कितीतरी दिवसांनी ते दोघं भेटले . टंच बांधा , सुंदर गोरा मुखडा . टपोरे बोलके डोळे सौंदर्य खुलवत होते . त्याच्या एका झलकेसाठी ती आसुसलेली असायची . त्याचा स्वभाव , त्याचा रुबाब , त्याचं भरदार शरीर , सगळ्याच गोष्टींनी त्याच्यासाठी वेडी झालेली . पोरं हिच्यावर आणि पोरी त्याच्यावर जीव टाकून असायच्या .पण दोघंही कोणाला दाद देत नव्हती .तिला तोच हवा होता .

जडण घडण - २६

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 1:00 pm

संपर्क कायम आहे आमचा पण अर्थात विलंबित लयीत. आता भेटायची इच्छा अजिबातच नाही. ते दु:खं तसंच, तिथेच गोठलंय. समोर उभ्या समस्येला पाठ दाखवणं मान्य नव्हतंच कधी. मग जे घडलं, ते स्वीकारलं गेलं.

मुक्तकप्रकटन

Stock (शतशब्दकथा स्पर्धेसाठी नाही

कहर's picture
कहर in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 12:41 pm

३१ जुलै २०१५
चंदू: "काही नवीन stock आहे का रे?"
नंदन: "नाही यार"
चं: "तुझ्याकडे नाही म्हणजे विशेष आहे?"
नं: "अरे काल बाबांना मस्त २mbps चे नेट connection घ्यायला लावले प्रोजेक्ट च्या नावाखाली. उद्या चालू होतंय. आता Stock ठेवायची गरज नाही. रिस्क कोण घेणार? आता onlineच बघायचे फक्त. नवीन नवीन. without buffering दन दन दन "
चं: "मजा आहे यार तुझी आम्हाला पण बोलाव कधीतरी"
नं :"नक्की. आज रात्रीच सगळा जुना stock उडवणार. नही चाहिये वो पुराना सडेला माल."

बालकथा