[शतशब्दकथा स्पर्धा] देवकी

dadadarekar's picture
dadadarekar in स्पर्धा
6 Aug 2015 - 12:03 am

' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.

मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.

भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?

कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली !

दुसर्‍या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली ..

' ये रे माझ्या बाळा ! '

माझ्या बापाला चारही मुलीच . बाकी तीन बहिणीनाही तीन मुलीच . मला मुलगा झाला तर तो माझ्या बापाला दत्तक देवून मी संसारातून बाहेर पडुन माहेरच्यांच्यासाठी नोकरी करणार.

"मुलगा व्हावा. कृष्णासारखा व्हावा !

जन्माला तुझ्या घरात येऊन वाढायला माझ्या घरात जावा !
"

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

6 Aug 2015 - 12:13 am | dadadarekar

माझी कथा कृपया स्पर्धा विभागात हलवावी.

जेपी's picture

6 Aug 2015 - 6:53 am | जेपी

+0
लॉजीक पटल नाही.
मंजे मुल माहेरी दत्तक देणे आणी पुन्हा त्यांच्यासाठीच काम करायच.

हा त्याचा च उलटा प्रकार.

अनन्त अवधुत's picture

6 Aug 2015 - 6:56 am | अनन्त अवधुत

+१

पगला गजोधर's picture

6 Aug 2015 - 8:20 am | पगला गजोधर

Vegalaa vishay

माहितगार's picture

6 Aug 2015 - 8:44 am | माहितगार

जन्माला तुझ्या घरात येऊन वाढायला माझ्या घरात जावा ! "

दुसर्‍या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली ..

' ये रे माझ्या बाळा ! '

माझ्या बापाला चारही मुलीच . बाकी तीन बहिणीनाही तीन मुलीच . मला मुलगा झाला तर तो माझ्या बापाला दत्तक देवून मी संसारातून बाहेर पडुन माहेरच्यांच्यासाठी नोकरी करणार.

"मुलगा व्हावा. कृष्णासारखा व्हावा !

एकवेळ नवरा आणि सासरची मंडळी (पुरोगामी दृष्टीकोण ठेऊन) मुलगा हवा म्हणून मागे लागत नाहीत, माहेरच्यांनाच मात्र मुलगा होऊन हवा असतो. जमल्यास मुलगा माहेरी वडीलांना दत्तक देणे हि तशी जुनीच प्रथा आहे. या कथेत बदलत्या समाजाच एक वास्तव आल नाहीए मुलगा झाला नाही तर माहेरची मंडळी प्रसंगी जावयालाही दोष देतात (शिक्षणाचा परिणाम अजून काय ? ! :) ) हे ही पाहीलय.

' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.

मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.

भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?

पण या पहिल्या ओळींमधेय लेखक दादांना काय म्हणायचय हे समजंल नाही.

dadadarekar's picture

6 Aug 2015 - 9:19 am | dadadarekar

बायकोला ते पोस्टर भाजीवालीच्या दुकानात दिसलं. तिने ते मागून आणले.

भिंतेवर दोन चार चित्रे होती. तेच देवघर .

दादा, इथे स्पष्टीकरण द्यावं लागतंय म्हणजे कथा पुरेशी बोलकी नाहीये.
हे आपलं च नाही तर बऱ्याच लोकांबाबत होतंय. (माझ्यासकट) सिक्वेल चा विचार केल्यानं असेल की नंतर च्या भागात लिहू पण ते स्पष्ट करण्याची उत्सुकता वाचकांना वाटू द्यायला हवी. स्पर्धेची हीच थीम असावी बहुतेक.

माहितगार's picture

6 Aug 2015 - 1:38 pm | माहितगार

दादांचा प्रयत्न चांगला आहे, अर्थात कथा अजून जराशी बोलकी व्हावयास हवी.

जडभरत's picture

6 Aug 2015 - 11:05 am | जडभरत

+१

सौंदाळा's picture

6 Aug 2015 - 11:10 am | सौंदाळा

+१

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले

+०

काहीही हां दादाश्री

सुबोध खरे's picture

6 Aug 2015 - 12:29 pm | सुबोध खरे

माझ्या बापाला चारही मुलीच.बापाला चार मुलीच असतील तर पात्र मुलगी असणार
' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.बायको असेल तर पात्र मुलगा असावा
लेखक( पात्र) मुलगा आहे कि मुलगी?
गोंधळ होतो आहे?
अज्ञानाबद्दल माफ करा

dadadarekar's picture

6 Aug 2015 - 12:39 pm | dadadarekar

तो व बायको दोनच पात्रे आहेत.

त्याच्या सासर्‍याला चार मुली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Aug 2015 - 9:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कथा बायको सांगतीये का नवरा? इथे घोळ होतोय दद्दाद्दरेकर. बाकी चंद्रचांदणीचं पोस्टर नै मिळालं का?

पैसा's picture

8 Aug 2015 - 11:44 am | पैसा

चंद्रचांदणीवाल्यांना दत्तक घेता येत नाही बहुतेक.

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2015 - 12:41 pm | टवाळ कार्टा

त्यांना ४ चानस अस्तात...एक तरी नेम बसतोच...हा आता आइंजेक्शनच खराब असेल तर गोष्ट वेगळी

तुडतुडी's picture

6 Aug 2015 - 12:54 pm | तुडतुडी

नाही आवडली .

सटक's picture

6 Aug 2015 - 6:10 pm | सटक

पूर्वी असे झाल्याचे ऐकिवात आहे, म्हणजे मूल माहेरी दत्तक देण्याचे...पण काडीमोड घ्यायचा हे थोडे unexplained वाटले...कदाचित पुढील भागात कळेल!

dadadarekar's picture

7 Aug 2015 - 8:06 pm | dadadarekar

खोट्या कथांना +१.

आणि १०० % सत्यकथा लिहून आमच्या कथेला मात्र नापास केले !

मुक्त विहारि's picture

7 Aug 2015 - 9:48 pm | मुक्त विहारि

१०० % सत्यकथा लिहून आमच्या कथेला मात्र नापास केले !.....

असे नाही......

तुम्ही काय किंवा माझ्या सारखेच इतर अनेक जण काय....

आपण चपखल शब्दांत आपले अनुभव मांडू शकलो नाही.

असो,

तुमच्यासारखाच दोष माझ्याकडून पण झाला आहेच.

(स्वगत : दोष आपल्याकडे घेतला की, आपलेच दोष फार लवकर दूर होतात.अद्याप तरी माझा अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास सुरु आहे.)

स्वगत मस्तच मुविजी!!! याबद्दल माझ्याकडून तुम्हांस एक चिकन बिर्याणी विथ "ते" पार्टी लागू. नम्र राहिले तर खूपसे प्रश्न सुटतात असा माझा अनुभव!!!

मी स्वतः मस्त दम बिर्याणी बनवतो म्हणून म्हटले. मला पाकृ पण टाकायची आहे पण फोटो अपलोड अजून करता येत नाहीत म्हणून थांबलोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Aug 2015 - 9:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेवायला बोलवा. फोटो स्वतः टाकुन देईन =))

जडभरत's picture

8 Aug 2015 - 12:03 pm | जडभरत

करुया एकदा कट्टा!!!

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 12:06 pm | मुक्त विहारि

आमचे परत आखाती देशांत जायचे दिवस जवळ येत चालले आहेत.....

(कट्टोत्सूक) मुवि

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 8:25 pm | बहिरुपी

+२११

पैसा's picture

7 Aug 2015 - 8:30 pm | पैसा

+१

मुक्त विहारि's picture

7 Aug 2015 - 9:50 pm | मुक्त विहारि

कथा समजली नाही.

कट्ट्याला आलात आणि कथा उलगडून सांगीतलीत तर उत्तम.

तोपर्यंत....

+०.५

dadadarekar's picture

7 Aug 2015 - 10:59 pm | dadadarekar

बायकोला संसार नकोच होता.

माहेरची रिकामटेकडी पोसायला तिला भीष्माचार्य व्हायचं होतं.

पण बायको भीष्माचार्य झाली तर या पिढीचा प्रश्न मिटला.

ते नवीन बाळ म्हणजे पुढच्या पिढीची सेवा करायला पुढचा भीष्माचार्य उर्फ ' कटाप्पा ! ' म्हणून ते बाळ तिकडे द्यायचे .

माहेरची रिकामटेकडी पोसायला तिला भीष्माचार्य व्हायचं होतं
महाभारत वाचलंयत तरी काओ! कायपण भंकस!!!

बोका-ए-आझम's picture

8 Aug 2015 - 12:51 am | बोका-ए-आझम

दादा, ही कथा शतशब्दकथेच्या format ला योग्य वाटली नाही. हिचा आवाका खूप मोठा आहे. हे म्हणजे पंजाबी लस्सी कटींग चहाच्या ग्लासमध्ये देणं झालंय.

माहितगार's picture

8 Aug 2015 - 8:28 am | माहितगार

... म्हणजे पंजाबी लस्सी कटींग चहाच्या ग्लासमध्ये देणं झालंय.

उपमा मस्तय ! या उपम्याला आमचा +१ :)

अरुण मनोहर's picture

8 Aug 2015 - 12:13 pm | अरुण मनोहर

कथेच्या लेखकावर कधीही कथा समजाऊन देण्याची वेळ येऊ नये! ते लेखकासाठी फार त्रासदायक असते, हा अनुभव मी घेतलेला आहे.
शहाणपण यातच असते, की कथा किंवा कविता ह्यांच्या अर्थाचे चर्वितचरण, लेखकाने चुकून देखील करू नये. कितीही उकसावले तरी!
ज्याना नाही समजले, त्यांचा तोटा! आपल्याला काय? म्हणून मजा बघत रहावे!

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 1:37 pm | मुक्त विहारि

"मिपावर" तरी, लेखकाला, त्याची कथा वाचकांना समजावून द्यायलाच हवी.

"कूट-कथा" असली तरी.

कारण, त्याशिवाय, "लेखक-वाचक" हे समन्मवय राहणार नाही.

"मिपावर" अशी लोकशाही असल्यानेच मी अद्याप "मिपाकर" आहे.

सुहास झेले's picture

9 Aug 2015 - 1:01 am | सुहास झेले

अजून खुलवता आली असती... पुलेशु