जोर का झटका धीरे से लगे
रस्त्यावरच्या कोपऱ्यावर अचानक ती त्याच्या समोर आली .गेल्यावेळच्या भेटी नंतर आज कितीतरी दिवसांनी ते दोघं भेटले . टंच बांधा , सुंदर गोरा मुखडा . टपोरे बोलके डोळे सौंदर्य खुलवत होते . त्याच्या एका झलकेसाठी ती आसुसलेली असायची . त्याचा स्वभाव , त्याचा रुबाब , त्याचं भरदार शरीर , सगळ्याच गोष्टींनी त्याच्यासाठी वेडी झालेली . पोरं हिच्यावर आणि पोरी त्याच्यावर जीव टाकून असायच्या .पण दोघंही कोणाला दाद देत नव्हती .तिला तोच हवा होता .
त्याला समोर बघून तिच्या काळजातली धडधड वाढली .मादक नजरेत आव्हान देत ती त्याच्याकडे पाहत होती .त्याच्या स्मितहास्याने मनात कारंजी उडू लागली . अधिरतेने त्याच्याशी बोलण्यासाठी ती रसरशीत ओठ उघडणार तोच
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हात जोडून "जय बजरंगबली " म्हणून तो तिथून निघून गेला .
प्रतिक्रिया
मस्त . +१
आं !
का ? आपल्या कथेला मत द्याचं
कथा वाचून हसू आलं. आवडली.
खिक्क्. +१ जै राम जी की!
हाहाहा
+१
+१
क्या बात है.
+१
कथा तर भिडलीच, पैला प्रतिसाद
+१
+१
मस्त
+१
हाहाहाहा मस्तं !!
+१
+१