करड्या रंगाच्या ५० छ्टा- भाग-१

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
19 Apr 2025 - 9:43 pm
गाभा: 

प्रास्ताविक

सर्वप्रथम मी या विषयाचा तज्ञ नाही तसेच यामध्ये सक्रीय सहभाग नाही. माझे विवेचन हे माझ्या या विषयाच्या मर्यादीत वाचना चिंतना इत्यादी, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील काही अनुभवी कार्यकर्त्यांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतुन, व काही खासगी समारंभांना उपस्थित राहता आल्याने मिळालेल्या माफक अनुभवांतुन आलेले तोकडे असे आहे. तसेच स्वअनुभव नसल्याने हे एका काठावरुन बघत असलेल्या व्यक्तीचे विवेचन आहे हे कृपया ध्यानी घ्यावे तसेच या विषया संदर्भात आपल्याकडे काही नविन दृष्टीकोण वा माहीती असल्यास जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.

त्याचप्रमाणे हा विषय लैगिकतेशी संबंधित असल्याने व त्यातही फार संवेदनशील असल्याने. अनेकांना हा विषय कमालीचा असह्य असा किंवा तिटकारा आणणारा असु शकतो. तरीही कृपया हे लिखाण आपण आपल्या जबाबदारीवर वाचावे. त्याचप्रमाणे मी माझ्यापरीने कमाल संयमित शब्दांत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. बाकी काही चुकल्यास संपादक मंडळ अर्थातच सक्षम आहेतच.

तर अशा रीतीने हात वर करुन झाल्यावर आणि सात्विकांना सावध केल्यावर आणि संपादकांना नमस्कार करुन मी माझे दोन शब्द मांडतो.

सुरुवातीलाच मी असे सोयीस्कररीत्या गृहीत धरतो की बडसम या जीवनशैली विषयी सर्वांनाच एक मुलभुत अशी माहीती आहे. आणि जे मुद्दे मला महत्वाचे वाटले त्यांना ते मुलभुत आहेत की प्रगत आहेत माहीत नाहीत त्यांना हात घालतो. बा़की आंतरजालावर सर्व माहीती उपल्ब्ध आहेच त्यामुळे ते काही जाणून घेणेही फार अवघड नाही.

BDSM या जीवनशैली विषयी थोडेसेच....

तरी सर्वसाधारण BDSM (Bondage and Discipline Dominance and Submission & sadism and masochism) ही एक लैंगिक जीवनशैली मानली जाते. यामध्ये प्रामुख्याने वरील ५ घटक येतात. माझ्यामते ही व्याख्या ढोबळ आणी गचाळ आहे म्हणजे मला एक काटेकोरपणा आवडतो तशी ही काही नाही असो. तर यात ढोबळपणे दोन प्रकारच्या व्यक्ती येतात एक प्रभुत्ववादी एक दास्यवादी. यात प्रभु हा पुन्हा विविध प्रकारात विभागला जातो तसेच दास हा सुद्धा अनेक प्रकारांत विभागला जातो. तरी मुलतः दास हा प्रभु ला समर्पण करतो आणि प्रभु हा दासा ला नियंत्रीत करतो हा या संबंधातील मुलाधार आहे. किंवा दास हा आपले स्वातंत्र्य प्रभु ला अर्पण करतो व प्रभु त्या दासा ची जबाबदारी घेतो.

BDSM जीवनशैलीवरील एक आक्षेप

सर्वात मोठा आक्षेप किंवा बडसम जीवनशैलीवर घेतला जातो तो असा की यात तुम्ही म्हणजे प्रभु (dominant) ही व्यक्ती दासा चे (submissive ) चे लैंगिक शोषण किंवा बलात्कार किंवा abuse करत नाही का ? तर यावर महाजन असा दावा करतात की बलात्कार किंवा शोषण किंवा abuse यामध्ये व शुद्धतम स्वरुपात आचरलेल्या बडसम जीवनशैलीत एक मुलभुत फरक आहे तो म्हणजे संमती consent चा आता हीचे स्वरुप कसे आहे ते बघु या.
आदर्श बडसम आचरण करणारे consent चा वापर नेहमी करतात . म्हणजे दास व प्रभु हे दोन्ही परस्पर विचार विनिमय करुन झाल्यानंतर दास हा प्रभु ला स्वतःहुन संमती देत असतो त्यांच्या भाषेत याला कौतुकाने दास आपले दास्यत्व submission स्वेच्छेने गिफ्ट करत असतो. या संमती चे स्वरुप असे असते

BDSM मध्ये संमतीची महती

FRIES. (Freely Given, Reversible, Informed, Enthusiastic, and Specific) ही संमती स्वेछेने दिलेली असते, ही केव्हाही रद्दबातल ठरवता येते, यात संबंधित लैंगिक कृत्याची पुर्ण माहीती दिलेली असते, ही दास उत्साहाने आनंदाने (स्वतःच्या आनंदासाठी ) देत असतो, त्याचप्रमाणे हे विशिष्ट वेळेसाठी, खेळा साठी दिलेली असते. हे शब्द अगदी स्पष्ट आहेत. तर या वरील विवेचनातुन आपण उदा. असे म्हणु शकतो की

१- जेव्हा दोन व्यक्ती या पुर्णपणे सज्ञान आहेत व प्रौढ आहेत.
२- त्यांनी परस्परांच्य लैंगिक आनंदासाठी विचारपुर्वक, स्वेच्छेने इ. अमुक एका कृत्यासाठी उदा. spanking साठी परवानगी दिलीघेतली आहे.
३- आणी हे पुर्णपणे खासगीत किंवा ज्या लोकांची याला संमती आहे अशांच्याच उपस्थितीत याचे प्रयोग केले वा अंगिकार केला तर

हा बलात्कार किंवा शोषण किंवा abuse नाहीच. उलट हा आपल्या अंतस्थ आकांक्षांना दिलेला एक प्रतिसाद, किंवा उत्कट भावनांचा एक अविष्कार आहे एक स्वीकार आहे. यात कुणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेच यात Safe, Sane, and Consensual या संकल्पनेचाही आग्रह केला जातो जीचा अर्थ उघड असा आहे.

मला व्यक्तीशः हा तर्क आवडला. यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी काहीही आढळले नाहे. शिवाय जसे प्रत्येक क्षेत्रात तत्ववादी शुद्ध आचरक असतात तसेच वाईट लोकही असतात. पण मुळ भुमिकेत काहीही आक्षेपजनक असे नाही. व ही योग्य रीत्या वरील आक्षेपांचा प्रतिवाद करते. आता प्रत्यक्षात काय होते किती आचरण होते नाही हा एक अभ्यासाचा विषय आहे त्याबाबतीत मजकडे विदा नाही.

BDSM जीवनशैलीतील लोकशाही आणि थक्क करणारे वैविध्य

या जीवनशैलीत एक कमालीचे थक्क करणारे असे वैविध्य आहे तसेच असंख्य प्रकार आहेत. जे एका वेग्ळ्या लेखाचा विषय आहेत. पण इथे जो मुद्दा मी म्हणतो य तो असा की. दुरुन पाहत असलेल्या व्यक्तीला कदाचित असे वाटेल की हे कुठेतरी एकांगी बाहेरील जीवनासारखे आहे पण ते तसे नाहे. म्हणजे काय ? तर बघा यात विवीध खेळ खेळले जातात त्यात त्या खेळांमध्ये

१-कधी पुरुष प्रभु असतात व स्त्री दास्यत्व तर कधी स्त्री प्रभु असते व पुरुष दास्यत्व स्वीकारतो.
२- कधी ऐतिहासिक वंचित गटाचा पुरुष (उदा.अफ्रीकन पुरुष ) हा प्रभु असतो तर तो कधी दास ही असतो. त्याचप्रमाणी स्त्री सुद्धा
३- कधी ऐतिहासिक अभिजन गटाचा पुरुष ( उदा.गौर वर्णीय पुरुष ) हा दास ही असतो कधी प्रभु ही असतो.
४- कधी समलिंगी पुरुष हा प्रभु असतो कधी दास असतो.
५- कधी स्त्रीवादी स्त्री किंवा पुरुषवादी पुरुष हे पारंपारीक भुमिकेच्या विरुद्ध भुमिका बडसम च्या खेळात घेतात.
व अशाच प्रकारे अनेक प्रकारची जुळणी होत असते. सांगायचे तात्पर्य असे की बाहेरील जगामध्ये ज्या पारंपारीक भुमिका वा संकेत आहेत त्यांच्या पुर्णपणे विरुद्ध वा समांतर असे सर्वच प्रकारांत गट किंवा जोड्या कार्यरत असतात. इथे एक प्रकारचे कमालीचे असे स्वातंत्र्य व लोकशाहीकरण असे आहे. जे पुन्हा वरील संमती च्या वर्तुळाच्या आत मर्यादेत असते. हे रोचक आहे.

५० रंगाच्या करड्या छटा या सिनेमाबद्द्ल

करड्या रंगाच्या ५० छटा (50 shades of gray ) हा चित्रपट साधारण १०/१२ वर्षापुर्वी जगभरात प्रदर्शित झाला हा ३ भागात काही अंतराने आला. या चित्रपटाने एका अर्थाने इतिहास घडवला. तो असा की अनेक भाबड्या जीवांना अनेक सात्विकांना अनेक अगरबत्तीवादींना या चित्रपटामुळे बडसम ही एक जीवनशैली असते व ती अस्तित्वात आहे वगैरी माहीत झाले. तर बडसम जीवनशैली जरी औपचारीकरीत्या गेल्या काही वर्षांमध्ये विकसीत होत आलेली असली तरी त्यातील मुलभुत प्रेरणा प्रभुत्व वाद किंवा दास्यवाद या हजारो वर्षे जुन्या आहेत. तरी या जीवनशैलीला मुख्य चर्चेच्या प्रवाहात आणण्याचे काम या चित्रपटत्रयीनेच केले यात काहीच शंका नाही. हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर आधारीत आहे. दोन्ही वाचुनबघुन झाल्यावर मला चित्रपट काही बाबतीत उदा. चित्रीकरण, अभिनय, संगीत, उतकृष्ठ चित्रीत केलेली लैगिंक दृश्ये यासाठी फारच आवडला. मात्र कथानक किंवा ज्याला आपण खोली म्हणतो असे यात काही फारसे आढळले नाही. पण तरीही आवर्जुन एकदा तरी बघावा असा हा चित्रपट नक्कीच आहे. यात दाखवण्यात आलेले बडसम जीवनशैली चे चित्रीकरण हे मात्र वादग्रस्त आहे.

या क्षेत्रातील मुंबईतील एक मोठ्या कार्यकत्या जोडीशी जेव्हा या संदर्भात संवाद साधला तेव्हा असे कळले की या बाबत मतभेद आहेत. त्यांच्या मते या चित्रपटाने हा विषय इथपर्यंत निषीद्ध असलेला विषय चर्चेत आणला हे मोठेच योगदान आहे. यानंतरच जगभरात या जीवनशैली कडे अनेकंचे लक्ष वेधले गेले वगैरे झाले. मात्र या चित्रपटाने अनेक गैरसमजांना ही जन्म दिला. जसे की या चित्रपटाच्या नायकाची प्रेरणा ( या जीवनशैली कडे येण्याची ही त्याच्या बालपणात झालेल्या लैगिक शोषणाची दाखवलेली आहे, याने ही जीवनशैली अंगिकारलेले लोक हे जणु मानसिकदृष्ट्या कमकुवत वा विकृतीशी याचा संबध जोड्ल्यासारखे मानले जाते असा आक्षेप आहे. हा एक मोठा अजुन वादाचा मुद्दा आहे की जे लोक कुठल्याना कुठल्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत तेच या जीवनशैलीकडे आकर्षीत होतात असा एक विरोधकांचा आक्षेप आहे. उदा. complex post traumatic stress disorder किंवा narcissistic personality disorder किंवा co dependent personality disorder या तीन मानसिक आजार असलेल्या व्यक्ती याकडे आकर्षीत होतात. तसेच ज्यांचे बालपण कुठल्या तरी child abuse च्या अनुभवातुन गेलेले आहे इत्यादीच मंडळी याचा स्वीकार करतात या अर्थाने. तर कार्यकत्यांचे म्हणणे असे की हा चित्रपट अशा "गैरसमजांना" खतपाणी घालतो. तसेच हा चित्रपट वास्त्वव्वादी नाही. तसेच यातील नायक सत्ता आणि पैसा याच्या बळाचा वापर करतोय असा चुकीचा संदेश जीवनशैली संदर्भात पसरतो. असे यांचे म्हणणे आहे.

मग वास्तववादी भडक नसलेला कुठला चित्रपट आहे असे विचारल्यावर मला Babygirl यापेक्षा खुप उजवा आहे असे सुचवण्यात आले. Nicole Kidman या उत्कृष्ठ अभिनेत्रीची मुख्य भुमिका असलेला चित्रपट नुकताच डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला आहे. हा बडसम जीवनशैलीवर आधारीत असलेला एक उत्कृष्ठ अस्सल वेगळ्या धाटणीचा व फारच खोलवर अशा मानवी भावनांचा आढावा घेणारा असा आहे. हा चित्रपट जरुर एकदातरी पहावा
या चित्रपटाविषयी पुढील भागात सध्या टंकाळा आलाय....

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

20 Apr 2025 - 5:11 am | चित्रगुप्त

'बडसम' हा शब्द ऐकून माहिती असला तरी ते नेमके काय प्रकरण असते ते ठाऊक नव्हते. सिनेमापूर्व काळात याचे चित्रण (मूर्तीकला, पेंटिंग, रेखाचित्रे, कथाचित्रे, कार्टून इ. स्वरूपात ) केले गेलेले आहे का, याविषयी शोध घेता काही प्रतिमा सापडल्या, उदाहरणार्थः
.

यानंतर सर्चताना 'सेफ सर्च ऑफ' करून बघता अक्षरशः हजारो, वैविध्यपूर्ण फोटो, कार्टून, कथाचित्रे वगैरे आहेतसे दिसले. मात्र ते बघणे कंटाळवाणे वाटले.
प्राचीन भारतीय मूर्तीकला, कामसूत्र, इत्यादिकात हा प्रकार आहे का ? त्याला काय नाव दिलेले आहे ?
-- पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बहुधा फारसे काही नसावे

https://www.reddit.com/r/BratLife/comments/1elv1tr/brattastic_reading_th...

या धाग्यावर कामसुत्र ग्रंथातील काही संदर्भ दिलेले आहेत.

मला यावर फारशी माहीती नाही.

वामन देशमुख's picture

20 Apr 2025 - 8:07 am | वामन देशमुख

अनेक भाबड्या जीवांना अनेक सात्विकांना अनेक अगरबत्तीवादींना या चित्रपटामुळे बडसम ही एक जीवनशैली असते व ती अस्तित्वात आहे वगैरी माहीत झाले.

सात्विक व अगरबत्तीवादी म्हणजे कोण, त्यांची लक्षणे व उदाहरणे सांगितली तर समजायला मदत होईल.

एक माझी आपली शैली आहे लिखाणाची.
इतके गंभीरतेने लिहीलेले नाही सहज आपलं एक काही मंडळी फार सात्विकतेचा आव आणतात उगीचच म्हणुन.
पण गंमत म्हणुन होत ते...

एका BDSM समुहाचे नविन सभासदांच्यासाठीचे काव्यमय सुंदर असे गीत हे असे आहे.
हे स्वागतगीत मला खुपच आवडले. यातील शब्द यातील भावना फार सुंदर अशा व्यक्त केलेल्या आहेत.

Welcome, Lost Soul…

You have wandered from the path, drawn by a hunger you barely understand. But fear not—here, within these sacred walls, your temptations are not sins; they are sacraments. You kneel not in shame, but in devotion. You confess not for absolution, but for indulgence.

This is no place for the timid. Only those who crave the weight of power, who long to surrender or to command, may stand at this altar. We do not preach restraint; we revel in revelation. We do not silence our desires; we sanctify them.

Come forth. Offer your obedience, or claim your throne. Either way, you belong to us now.

The sermon has begun.

याचा मराठी अनुवाद करायला मजा येइल.