काथ्याकूट

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
24 Dec 2018 - 19:27

मरणावरती बोलू काही

तर मिपाकरांनो , आज आपण सर्व एका आगळ्यावेगळ्या , काही प्रमाणात नकोश्या वाटणाऱ्या या मरणावर बोलूयात . कदाचित हा विषय , मला माहित नाही पण याआधी इथे चर्चिला गेलाही असेल पण मी बोका साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत तोच विचार मनात घोळवत आलोय ...
जगण्याचं कारण इथे प्रत्येकाकडे असतं किंबहुना ते असावंच लागतं, तेव्हा कुठे जगणं जीवन बनतं . पण मरणाबद्दल काय ? त्याच्या बद्दल कुणाकुणाला काय वाटतं ..

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
23 Dec 2018 - 13:50

येत्या १५ वर्षात...

हा धागा आमच्या एका व्हॉटसअॅप समुहात झालेल्या चर्चेवर आधारीत आहे.

मी काही व्यवसायांची यादी आणि ते येत्या १५ वर्षात भारतात त्यांची मागणी का मंदावेल याची कारणंही देतो आहे. ती बरोबरंच आहेत असा अजिबात दावा नाहीये.किंबहूना ती बरोबर आहेत का हे तपासण्यासाठीच इथे देतोय.

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Dec 2018 - 18:00

अफगाणीस्तान पुन्हा एकदा तालीबानच्या ताब्यात जाताना

जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपदी आरूढ होताना आमेरीकेचे सद्य सर्वेसर्वा डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपला जन्म व्यावसायिकतेत गेल्या मुळे आपण डिल मेकींगमध्ये काही खासच आहोत आणि आपल्या या कौशल्याचा फायदा आमेरीकन जनतेला करून देऊ अशा बढाया मारल्या.

वन's picture
वन in काथ्याकूट
20 Dec 2018 - 19:14

जय जवान !

काही दिवसांपूर्वी एका पेपरात खालील बातमी वाचली:

‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’.

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
18 Dec 2018 - 23:29

रू. १५ लाख मिळणार ,पण.....

पंधरा दिवसांपूर्वी बाबांच्या मो. सायकलचा थर्ड पार्टी विमा काढला. गेल्यावर्षीपेक्षा बरेच जास्त पैसे सांगितल्यामुळे चौकशी केली तेव्हा समजले यंदापासून पर्सनल अॅक्सिडंट विमा मद्रास हायकोर्टाच्या आदेशामुळे कमीतकमी १५ लाख केल्यामुळे प्रिमियममध्ये वाढ केली आहे. आतापर्यंत एक लाखाचा PA अनिवार्य होता ज्यास रू. ५० लागायचे, तो आता १५ लाख केल्यामुळे थर्ड पार्टी प्रिमियम मध्ये रू. ७५० वाढ झाली.

स्नेहांकिता's picture
स्नेहांकिता in काथ्याकूट
17 Dec 2018 - 13:07

ओला, उबेर आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या पन्क्चुअल / रिलायेबल आहेत का ?

काल पुण्यनगरीस जाणे झाले होते. एकटीच असल्यामुळे निवांत बसने जायचे ठरले. धनकवडीत मुलगा आहे. सकाळी अकरा वाजता त्याच्यासोबत नाष्टा झाल्यावर बारापर्यंत त्याच्यासह बावधनला बहिणीकडे जायचे होते. मुलाने उबेर टॅक्सी ऑनलाईन बघितली. ३०० रु. रेट आला. ओलाचा १८०. ओला कॉल केली असता ५ ते १० मिनिटात येईल असे समजले.

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Dec 2018 - 09:36

नास्तिक धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असतात ?

एका युट्यूब व्लॉगर नास्तिक स्त्रीला तुम्ही ज्या धार्मिकतेचा त्याग केला त्याच धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असता ? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर ती तीच या ताज्या युट्यूब मधून मत व्यक्त करत आहे.. तिची कोणती मत तुम्हाला पटतात आ,णि कोणती पटत नाहीत ?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
14 Dec 2018 - 14:51

डिलीट बटन

आपण लेख कविता आदी पोस्ट करतो मिपा समूहावर
प्रकाशित चे बटन दाबले की साहित्य प्रकाशित होते
आपण आपलेच प्रकाशित लेख वाचतो त्या वेळी वा काही वेळा लेख जमला नाही असे वाटते
पण मी पा वर साहित्य डिलीट करता येत नाही
तशी सोया नाही
अन्य ठिकाणी अशी सुविधा आढळते
मी पा व्यवस्थापन या वर विचार करेल का ?

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in काथ्याकूट
14 Dec 2018 - 00:45

शिक्षणाच्या आईचा घो

रविवार आंबट गोड.

शनिवारी लेकीचा दुसर्या टेस्टचा निकाल लागला.निकाल म्हणजे ॲक्च्युली निकाल.मागच्या एक्झामला ज्या विषयांत कमी मार्क्स होते त्यात यंदा जास्त आणी ज्यात जास्त होते त्यात कमी ?

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
13 Dec 2018 - 14:53

विमान प्रवासातील चोरी- सल्ला हवा आहे

दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ५.५० च्या एअर इंडियाच्या विमानाने मुंबई नागपूर प्रवास केला जे विमान एक तास उशिरा सुटले म्हणजे ६.५० ला

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
12 Dec 2018 - 09:08

कुलदैवत!

सध्या खंडोबाची षष्ठी सुरु आहे.त्यानिमित्याने हा प्रश्न सुचला आहे.

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
10 Dec 2018 - 12:31

युट्यूब रिअ‍ॅक्शन व्हिडीओ कशा बनवाव्यात ? (माहिती हवी)

निसटत्या बाजू मांडणे हि माझी स्पेशॅलिटी आहे. गेल्या आठवड्याभरात पाक पंप्र इम्रानखानानी बरीच विवाद्य विधाने केलीत, त्यात बलोचीस्थानी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या त्याच्या भाषणाचा उहापोह करत इम्रानच्या निसटत्या बाजू युट्यूबरूनच हिंदी आणि इंग्रजीतून का मांडू नयेत असा विचार केला.

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in काथ्याकूट
5 Dec 2018 - 17:03

सकारात्मक कटाक्ष - १ (हेल्मेटसक्ती)

गाभा : विचारांचं सामर्थ्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो.
सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते.
त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं.
मनात येणाऱ्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा.

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
1 Dec 2018 - 20:43

तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी काय संस्कार दिले?

थांबा..

असा धागा ऐसीवर आलाय, त्याची replica म्हणून मी हा धागा काढलेला नाही. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू झाले.

एकंदरीत चर्चेचा आशय असा होता की मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करणे इझ टिपिकल लोवर मिडल क्लास.. (सॉरी, साराभाई संचारली अंगात), मुख्य म्हणजे आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार करणे हे दमनशाही टाइप काहीतरी आहे वगैरे.

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Dec 2018 - 11:57

चालू घडामोडी - डिसेंबर २०१८

सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय.

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
30 Nov 2018 - 15:54

MLM नंतर SLM, अर्थात नव्या बाटलीत जुनीच दारू.

मल्टी लेव्हल मार्केटिंगनंतर सध्या सिंगल लेव्हल मार्केटिंगचा सुळसुळाट झालेला पहायला मिळतो. यामध्येे ठरविलेली रक्कम भरून आपण सामील व्हायचे. ही रक्कम रूपये १०००, १५००, २००० किंवा कंपनी ठरवते त्याप्रमाणे असते. काहीवेळा रक्कम न भरताही कंपनीमध्ये थेट सामील होता येते.

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 Nov 2018 - 22:47

इम्रान आणि कर्तारपुरातील भारतीय नाचक्की

या आठव्ड्यात पाकीस्तानातील गुरु नानकदेवांचीं श्रद्धेय स्मृतीस्थान असलेल्या शीखयात्रेकरुंसाठी सहज भेट देता येईल असे भारत आणि पाकीस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरीडॉर बाबत सहमती होऊन सीमेच्या दोन्ही बाजूला शीलान्यासाचे कार्यक्रम झाले. एकदा पाकीस्तानने अनुमती दिल्या नंतर भारताला नको म्हणणे कठीण असणार होते. तेव्हा भारतानेही सहाजिक प्रस्ताव स्विकारला.

आकाश कंदील's picture
आकाश कंदील in काथ्याकूट
26 Nov 2018 - 15:57

शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता

शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता

हल्ली शेतकऱ्याचे मोर्चे / महामोर्चे / संप (नवीन प्रकार) अजून नित्यनियमाचे झाले नसले तरी बऱ्यापैकी नियमित झाले आहेत. यात बऱ्यापैकी राजकारण आहे आणि काहींबाबतीत सच्चाई सुद्धा आहे.

या बाबत मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
26 Nov 2018 - 15:49

मिपा वर्धनासाठी किंवा प्रसारासाठी कुणी वैयक्तिक प्रयत्न करत का ?

अगदी प्रांजळपणे सांगायचे झाले तर आजपर्यंत बर्याच जणांना मी मिसळ पाव बद्दल सांगितलं आहे .. तिथे कसे जावे नि सदस्यत्व कसे घायचे .. किमान तीस ते चाळीस जण असतील ज्यांना मी मिपा बद्दल सांगितले आहे .. नाही म्हंटले तरी मी माझ्या आयुष्यातली पाचशे मिनिटे या मंचासाठी खर्च केली आहेत.. आणि अजूनही पुढे सत्कारणी लागतील ..