उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत.
ज्यांना पोलादी पडद्यात आणि इतरांच्या शोषणात आनंद मिळतो ते सहसा डावीकडे झुकलेले असतात. इतरांचे स्वातंत्र्य हे त्यांना आपल्या सत्तेला आव्हान वाटते. त्यांना समाजातील व्यक्तींच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग शोषक उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे शोषण करते आणि ती तिच्या खालच्या व्यक्तीचे. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. डाव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना साम्यवाद भ्रष्ट करणारी वाटते. मग मुली मुले पुरेशी ट्रान्सजेन्डर होत नाहीत म्हणून त्यांनी जास्त विचार करू नये, स्त्री पुरुष नसलेला जोडीदार पत्करावा वगैरे, कुटुंब सोडून पथभ्रष्ट होत जावे हे तत्त्वज्ञान माथी मारले जाते.
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या अत्याचाराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तीनामेन चौकातील हत्याकांड.
मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व देश उजवीकडे झुकलेले आहेत. डाव्या विचारसरणीवर आधारलेला देश काही काळ तरी टिकू शकेल याची मला उत्सूकता आहे. मुळात असा देश अस्तित्वात आणण्याची सामान्य जनतेची इच्छा तरी असू शकेल का याचीच शंका आहे.
तारतम्य मध्यममार्गात असते याचे उउजव्याना भान असते मात्र डाव्यांना त्याचा साफ विसर पडलेला असतो.
प्रतिक्रिया
19 Apr 2025 - 1:42 pm | श्रीगुरुजी
भारी! आवडलं.
19 Apr 2025 - 2:09 pm | चंद्रसूर्यकुमार
स्टालिन, माओ वगैरेंच्या दमनचक्रात मारले गेलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता तिआनानमेन हत्याकांड म्हणजे शेषनागापुढे गांडुळच जणू.
19 Apr 2025 - 2:55 pm | वामन देशमुख
व्हय व्हय, खरंय. डीपसीक नव्यानं आलं होतं तेंव्हा त्याला तीनामेन चौकाबद्धल कुणीही काहीही विचारलं की अजिबात काही सांगायचा नाही.
आता इथे लिहिताना तो संदर्भ लगेच डोक्यात आला. अजूनही डीपसीक तीनामेन चौकाबद्धल तेच सांगतो "क्षमा करा, ते माझ्या सध्याच्या परिघाबाहेरचं आहे, दुसरं काहीतरी बोलूया." असं म्हणतो.
तीनामेन चौकाबद्धल पोलादी पडद्यामागे लपवण्यासारखं इतकं काय आहे त्यात बरे? आणि ते शेषनागाचे फणे कोणते?
19 Apr 2025 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली
खरे आहे, उजवेपणा म्हणजे मुक्ती, स्वातंत्र्य, सुबत्ता, डावे विचार फेल
गेलेत मिळाली फक्त गरिबी, भ्रष्ट यंत्रणा नी गुलामी!
बाकी डाव्या विचारांपेक्षा भयंकर अशी मनुवादी विचारसरणी आहे, भारताला डाव्यांचा धोका नाही पण मनुवाद्यांचा आहे.
19 Apr 2025 - 2:28 pm | मुक्त विहारि
हे नक्की का?
काही उदाहरणे देऊ शकता का?
19 Apr 2025 - 2:38 pm | श्रीगुरुजी
मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार, गांधी, ठाकरे, अखिलेश, ममता अश्या भयंकर मनुवाद्यांचा धोका असे त्यांना म्हणायचे आहे.
19 Apr 2025 - 2:45 pm | मुक्त विहारि
लोचट माणसाच्या विचारांना किती गंभीरपणे घेणार?
19 Apr 2025 - 2:50 pm | श्रीगुरुजी
कोणीच घेत नाही. म्हणून तर टिंगलीचा विषय झालाय. लोक किल्ली देऊन मनोरंजन करून घेतात. मीही किल्ली दिलीये.
19 Apr 2025 - 2:55 pm | मुक्त विहारि
ही आयडिया भारी आहे...
19 Apr 2025 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
@ श्रीगुरूजी, बोललो होतो ना? १ = १०.
19 Apr 2025 - 2:33 pm | आग्या१९९०
ज्याचे AI शी वाकडं त्याची मसनात लाकडं. सती गेलेल्या स्त्रियांची आकडेवारी कधीच मिळणार नाही.
19 Apr 2025 - 2:52 pm | मुक्त विहारि
तसेच..
पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये झालेल्या अल्पसंख्यांक स्त्रियांचे काय हाल झाले ते पण समजणार नाही..
बाय द वे..
सध्या मुर्शीदाबाद येथील हिंदू स्त्रिया कशा आहेत? आणि बिजयनगर, राजस्थान मध्ये हिंदू स्त्रिया कशा आहेत?
19 Apr 2025 - 3:45 pm | आग्या१९९०
पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये झालेल्या अल्पसंख्यांक स्त्रियांचे काय हाल झाले ते पण समजणार नाही..
कसं बोललात !
इतक्या लवकर त्यांच्या मांडीला मांडी लावाल असं वाटलं नव्हतं.
19 Apr 2025 - 5:24 pm | मुक्त विहारि
सध्या मुर्शीदाबाद येथील हिंदू स्त्रिया कशा आहेत? आणि बिजयनगर, राजस्थान मध्ये हिंदू स्त्रिया कशा आहेत?
19 Apr 2025 - 5:29 pm | अमरेंद्र बाहुबली
मुर्शिदाबाद ला मी गेलो नाहीय, पण राजस्थानातील स्त्रिया इंगने उजळ असतात, थोड्या उंचही असतात. घुंघट प्रथा आहे.
19 Apr 2025 - 5:36 pm | मुक्त विहारि
प्रश्न कुणाला आणि उत्तर कुणाचे?
तरी पण खास तुमच्या माहिती साठी...
------
बिजयनगर रेप-ब्लैकमेल कांड में चार्जशीट पेश, लड़कियों को कलमा पढ़ने के लिए बाध्य करते थे आरोपी (https://www.indiatv.in/rajasthan/bijaynagar-rape-blackmail-case-chargesh...)
------
बंगाल में हिंसा पीड़ित महिलाओं का छलका दर्द (https://www.tv9hindi.com/india/murshidabad-violence-hindu-families-displ...)
-----
19 Apr 2025 - 5:39 pm | अमरेंद्र बाहुबली
लेखाचा विषय काय? तुम्ही लिहिताय काय? :(
19 Apr 2025 - 6:33 pm | मुक्त विहारि
चोंबडेपणा आपणच तर केलात...
असो...
आनंद आहे....
19 Apr 2025 - 4:54 pm | युयुत्सु
ज्याचे AI शी वाकडं त्याची मसनात लाकडं.
हे जळजळित सत्य समजायला अजून एकदोन वर्षे पुरेशी आहेत.
19 Apr 2025 - 2:50 pm | चंद्रसूर्यकुमार
सुधारणा- नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी तल्लख बुद्धीची पण ती तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते.
डावे-उजवे ही संकल्पना अर्थशास्त्रासारख्या समाजशास्त्रांमध्ये लागू असते मूलभूत शास्त्रात नाही. गणितावर आधारीत सगळी शास्त्रे (इंजिनरींग आणि मूलभूत शास्त्रे) यात 'मला काय वाटते' यावर काही आधारीत नसते- जे काही असते ते गणितातील मूलभूत सूत्रे आणि न्यूटनचे नियम, ओहमचा नियम वगैरे मूलभूत नियम यावर सगळे काही अवलंबून असते. पण समाजशास्त्रांमध्ये 'मला काय वाटते' यावर सगळे काही अवलंबून असते. हा फरक आहे. सरकार या प्राण्याचा अर्थकारणात किती सहभाग असावा यावरून डावे आणि उजवे यामधील फरक असतो. उजवे म्हणतात सरकारचा अर्थकारणात सहभाग कमी असावा तर डावे म्हणतात सरकारचा अर्थकारणात अधिक सहभाग असावा.
अमेरिकेत सॉल्टवॉटर आणि फ्रेशवॉटर विद्यापीठे ही संकल्पना आहे. दोन्ही किनार्यांजवळची विद्यापीठे ही सॉल्टवॉटर विद्यापीठे आहेत (हार्वर्ड, प्रिन्सटन, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी, एम.आय.टी, बर्कले, युसी अॅट लॉस अॅन्जेलिस वगैरे) तर महासरोवरांजवळची विद्यापीठे ही फ्रेशवॉटर विद्यापीठे आहेत (शिकागो, रॉचेस्टर, मिन्नेसोटा वगैरे). सॉल्टवॉटर विद्यापीठात डाव्यांचे प्राबल्य आहे तर फ्रेशवॉटर मध्ये त्यामानाने उजव्यांचे प्राबल्य आहे. हार्वर्डविषयी वेगळे सांगायलाच नको. आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब शिकागो विद्यापीठात होते. अर्थात सॉल्टवॉटरमधील १००% प्रोफेसर डावे आणि फ्रेशवॉटरमधील १००% प्रोफेसर उजवे असतात असे नाही. जगदीश भगवतींसारखे उजवे न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आहेतच. जगातील अर्थशास्त्राच्या विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) बघितले तर त्यात उजव्या बाजूच्या विद्यापीठांची संख्या एकदम कमी दिसेल- त्यात सॉल्टवॉटर विद्यापीठे बरीच जास्त दिसतील आणि फ्रेशवॉटर खूप कमी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे अमेरिकेबाहेरचे पण विद्यापीठ टॉप पाच मध्ये आहे. तिथे एकेकाळी आमच्या बाजूचे फ्रेडरीक हायेक हे एकदम उत्युंग व्यक्तिमत्व प्रोफेसर म्हणून होते. त्यांचे शिष्य बी.आर.शेनॉय यांनी भारताच्या समाजवादी छापाच्या दुसर्या पंचवार्षिक योजनेवर विरोधी मत दिले होते- तसे मत देणारे ते एकटेच होते. पण आज एल.एस.ई मध्येही उजव्या बाजूचे प्रोफेसर कमीच आहेत. शिकागो, रॉचेस्टर, मिन्नेसोटा ही त्यातल्या त्यात रँकिंगमध्ये वर असलेली उजवी विद्यापीठे आहेत व्यतिरिक्त उजव्या बाजूची आणखी दोन विद्यापीठे नावाजलेली (माझ्या माहितीत) आहेत जॉर्ज मेसन (फेअरफॅक्स, व्हर्जिनिया) आणि टेक्सस टेक. ही दोन विद्यापीठे रँकिंगमध्ये दिसलीच तर खूप खाली दिसतील. भारतातही जे.एन.यु, जादवपूर, सम्राट अशोक वगैरे विद्यापीठे रँकिंगमध्ये पुढे आहेत पण तिथे पण डाव्यांचे प्राबल्य आहे. युरोपमध्ये स्टॉकहोम, हेलसिंकी वगैरेंमध्ये पण फार वेगळी परिस्थिती नाही. यावरून मी म्हणतो की एखादा मनुष्य जितका अधिक हुशार तितका तो डावीकडे झुकायची शक्यता वाढते.
आता त्यांची बुध्दी गहाण ठेवलेली असे का म्हणतो? कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था अधिक चांगले काम करते हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवितात. तसेच पैसे छापून वाटले तर गरीबी मिटत नाही तर महागाईचा भडका उडून प्रश्न अधिक जटिल बनतो हे पण इकॉन-१०१ मध्येच शिकवतात. आणि हे नुसते 'मला वाटते' असे नाही तर तसे केल्यास प्रश्न वाढतात हे जगभरात बघितले गेले आहे. तरीही डावीकडचे प्रोफेसर बघितले तर ते जगभरातील अनुभवांकडे कानाडोळा करून नेमके तेच करावे असे सांगताना दिसतात. अभिजीत बॅनर्जी (एम.आय.टी मधील) २०१९ मधील राहुल गांधींच्या न्याय योजनेचे सल्लागार होते. तेव्हा रागा दरमहा पाच हजार द्या म्हणत होते तर अभिजीत बॅनर्जी त्यापेक्षा कमी (मला वाटते अडीच हजारच) द्या असे म्हणत होते म्हणून अभिजीत बॅनर्जींनी त्या योजनेला जाहीर समर्थन दिले नव्हते पण तत्वतः त्यांचा असे पैसे वाटायला विरोध नव्हता. या मोठ्या प्रोफेसरना मोठ्या सरकारी समित्यांवर जायचे असते. तसे सदस्यत्व त्यांचा 'स्टेटस सिम्बॉल' बनतो. आता सरकार अशा समित्यांवर 'मुळात सरकारने अर्थकारणात पडूच नये' असे म्हणणार्यांची नियुक्ती करणार नाही हे उघड आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की ही मंडळी आपल्या क्षेत्राशी प्रामाणिक असतात का? गणितात मूलभूत सूत्रांचे उल्लंघन करणार्याला (समजा कोणी २+२ = ५ म्हणू लागला तर) नोबेल सोडाच पहिली पास होणे मुश्किल होईल. पण अर्थशास्त्रात मात्र पैसे छापा आणि वाटा म्हणणार्यांना नोबेल मिळू शकतो.
डेमॉक्रॅटिक सोशालिस्ट हा एक नवा प्रकार गेल्या काही वर्षात आला आहे. म्हणजे आम्हाला लेनिन, स्टालिन, माओ, चे गव्हेरा यांच्या कत्तली नकोत पण त्यांचे अर्थकारण हवे असे म्हणणारा. असे मत असलेले लोक केवळ राजकारणातच असतात असे नाही. या आणि इतर संबंधित मुद्द्यांवर मिपावर मागे झालेल्या एका चर्चेत लिहिले होते. https://www.misalpav.com/comment/1127541#comment-1127541 सत्तेत येण्यापूर्वी लेफ्ट लिबर्टेरिअन असलेले लोक सत्तेत गेल्यावर लेफ्ट ऑथोरेटेरिअन बनतात हा अनुभव जगभरात आला आहे आणि त्याचे कारण त्या प्रतिसादात लिहिले आहे. तरीही अशा गोष्टींकडे हे लोक दुर्लक्ष करताना दिसतात. मग त्यांनी बुध्दी गहाण ठेवली असे का म्हणू नये?
19 Apr 2025 - 2:52 pm | मुक्त विहारि
जितका शिकलेला तितका तो हुकलेला...
19 Apr 2025 - 6:12 pm | श्रीगुरुजी
मुवि,
देऊ का किल्ली काही यडपटांना?
19 Apr 2025 - 2:58 pm | श्रीगुरुजी
मनमोहन सिंग केंब्रिजचे. केंब्रिज उजवे की डावे? मनमोहन सिंगांनी १९९० च्या दशकात आर्थिक सुधारणा आणल्या (म्हणजे मूळ कल्पना नरसिंहरावांच्या असल्या तरी अंमलबजावणीकार मनमोहन सिंग होते) म्हणजे ते उजवे असावे. परंतु पप्पूची वार्षिक ७२,००० खिरापत वाटण्याची योजना व्यवहार्य आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. म्हणजे ते डावे असावे.
19 Apr 2025 - 3:31 pm | आग्या१९९०
शेतकऱ्यांना केंद्र आणि महाराष्ट्र सरकार वर्षाला १२००० रुपये आणि लाडकी बहीण योजनेत दरमहा १५०० रुपये देणारे सरकार डावे की उजवे?
19 Apr 2025 - 3:43 pm | वामन देशमुख
मला वाटतं, आर्थिक बाबतीत काही अंशी डावे, राजकीय बाबतीत बऱ्याच अंशी उजवे.
19 Apr 2025 - 3:51 pm | आग्या१९९०
हायब्रीड म्हणा की. डाव्यांचे गुण कसे आले असतील बरं ह्यांच्यात?
19 Apr 2025 - 4:03 pm | वामन देशमुख
भारतातील सगळेच पक्ष आर्थिक बाबतीत कमी-अधिक डावे आहेत असे वाटते. त्याला काही इलाज नाही.
सर्वसामान्य जनतेला, विशेषतः लाभार्थ्यांना डावी धोरणे / पद्धती ही तात्काळ आकर्षक वाटू शकतात. त्यातील मध्यममार्गी / दूरगामी तोटे कळत नाहीत, कळूनही पटत नाहीत. उदा लाडक्या बहिणींना ₹१५००/- किंवा इतर कोणतीही रक्कम
19 Apr 2025 - 4:22 pm | सुबोध खरे
वयाच्या विसाव्या वर्षी जर तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्ही हृदयशून्य आहात
वयाच्या चाळिसाव्या वर्षी जर तुम्ही कम्युनिस्ट असाल तर तुम्ही अक्कलशुन्य आहात!
19 Apr 2025 - 5:01 pm | वामन देशमुख
उत्तरार्धाशी सहमत.
19 Apr 2025 - 5:19 pm | आग्या१९९०
गडी पंच्याहत्तरीला आला तरी अजून अक्कल आली नाही, रेवडी वाटप चालूच आहे, सौगात ए अमुक तमूक... किती शून्य द्याल?
19 Apr 2025 - 5:30 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! सोडा, संघ आणी भाजपने आदर्श घालून दिल्याप्रमाणे जसे इतर ज्येष्ठ नेते ७५ नंतर पायउतार केले गेले त्याला आदर्श मानून मोदी देखील ऑक्टोबरात राजीनामा देणार आहेत, तोवर झेला! :)
19 Apr 2025 - 5:34 pm | आग्या१९९०
नंतर झोला घेणार का ?
19 Apr 2025 - 5:35 pm | अमरेंद्र बाहुबली
:) लोकांना घ्यायला लावणार! :)
19 Apr 2025 - 6:36 pm | मुक्त विहारि
राजकीय उदाहरणे दोन तर आहेतच...
बाकी...
तुमचे विनोदी प्रतिसाद वाचले की वेळ मस्त जातो...
19 Apr 2025 - 7:16 pm | श्रीगुरुजी
भाद्रपदात (म्हणजे सप्टेंबरात) श्वान चेकाळतात तसे येथील श्वान सप्टेंबर २०२५ च्या कल्पनेने आतापासूनच चेकाळलेत.
20 Apr 2025 - 6:18 pm | चंद्रसूर्यकुमार
आग्या या सदस्याचे बरेचसे प्रतिसाद मी पूर्ण दुर्लक्षित करतो. तरीही या प्रतिसादाला उत्तर देत आहे.
भारतातील कोणताही राजकीय पक्ष आर्थिक दृष्ट्या उजवा नाही. काही कमी डावे आहेत तर काही अधिक डावे आहेत.
आपल्याकडे हा एक समजुतीतला मोठ्ठा घोटाळा असतो. राजकीय उजवे (भाजप, संघ वगैरे) हे आर्थिक दृष्ट्या पण उजवेच असतील असे गृहित धरून हे सगळे प्रश्न विचारले जातात. सत्य परिस्थिती तशी नाही. जनसंघाच्या काळापासूनही भाजप आर्थिक दृष्ट्या कधीच उजवा नव्हता. दिनदयाळ उपाध्यायांचे इंटिग्रल ह्युमॅनिझम आर्थिक उजवे थोडीच होते? मोदी सरकारच्या शेकडो योजना म्हणजे सरकारचे अर्थकारणातील स्थान वाढवायचाच प्रयत्न आहे. त्या योजना आर्थिक दृष्ट्या उजव्या थोडीच आहेत?
20 Apr 2025 - 6:00 pm | चंद्रसूर्यकुमार
इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये आता बहुतांशी डाव्यांचे प्राबल्य आहे. वर म्हटल्याप्रमाणे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उजव्या बाजूचे फ्रेडरीक हायेक होते. त्याच काळात समाजवादी हॅरॉल्ड लास्की पण होते. नेहरूंवर हॅरॉल्ड लास्कींचा खूप प्रभाव होता आणि दोघांमध्ये बराच पत्रव्यवहारही झाला होता. १९४५ मध्ये दुसरे महायुध्द संपताना इंग्लंडमध्ये निवडणुक झाली. त्यात विन्स्टन चर्चिल पराभूत झाले आणि क्लेमेंट अॅटली पंतप्रधान झाले. त्यावेळी लेबर (मजूर) पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतील अॅटलींबरोबर हॅरॉल्ड लास्की पण होते. सांगायचा मुद्दा म्हणजे एल.एस.ई पण तेव्हापासूनच डाव्या बाजूला झुकायला लागले होते.
मनमोहनसिंग आणि नरसिंहरावांनी सुध्दा सुधारणा आणल्या त्या किती स्वतःच्या प्रेरणेने आणल्या आणि किती आय.एम.एफ ने घातलेल्या अटींमुळे आणल्या हा पण एक प्रश्नच आहे. कारण मनमोहनसिंग १९९१ पूर्वीच्या २० वर्षांपासून प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर होते. त्यांना समजा प्रशासनात असताना सरकारच्या नितींची अंमलबजावणी करणे हेच करावे लागले. तरीही जसे बी.आर. शेनॉय यांनी समाजवादी छापाच्या दुसर्या पंचवार्षिक योजनेला प्रशासनात असतानाही विरोध केला तसे मनमोहनसिंगांनी कोणत्याही सरकारी निर्णयाच्या बाबतीत केल्याचे मी तरी वाचलेले नाही. इंदिरा गांधींच्या काळात एस.जगन्नाथन या रिझर्व्ह बँक गव्हर्नरने संजय गांधींच्या मारूतीला कोणत्याही रिस्क मॅनेजमेंट किंवा ड्यू डिलिजन्स शिवाय सरकारी बँकांकडून कर्ज दिले गेले होते त्याला विरोध केला म्हणून त्यांची उचलबांगडी करून त्यांना आय.एम.एफ मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठविले गेले. तसा कोणताही विरोध मनमोहनसिंगांनी मंत्रालयांचे सचिव किंवा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना केल्याचे ऐकिवात नाही. नरसिंहराव तर केंद्रात वरीष्ठ मंत्रीपदांवर राहिलेले होते. तेव्हाही कधी त्यांनी समाजवादी छापाच्या निर्णयांना विरोध केल्याचे मी तरी वाचलेले नाही. त्यामुळे त्या १९९१ च्या आर्थिक सुधारणा खरोखरच स्वयंप्रेरणेने झाल्या होत्या का आणि आपली आर्थिक स्थिती १९९१ मध्ये खालावली नसती तरी त्या सुधारणा झाल्या असत्या का हा प्रश्नच आहे.
20 Apr 2025 - 6:47 pm | श्रीगुरुजी
२१ मे १९९१ या दिवशी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने राजीव गांधींचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसातच सोनिया गांधींनी राजीव गांधी फाउंडेशन नावाची धर्मादाय संस्था आपण स्थापणार असून या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करणार आहोत असे सांगितले होते. नंतर २१ जून १९९१ या दिवशी नरसिंहराव पंतप्रधान झाले व काही दिवसांनी अर्थमंत्री मनमोहन सिंगांनी केंद्रीय अंदाजपत्रक संसदेत मांडले ज्यात राजीव गांधी फाउंडेशनला अंदाजपत्रकातून सरकारद्वारे १०० कोटी रूपये देणगी देण्याची तरतूद केली होती.
परंतु गंमत अशी की त्या दिवसापर्यंत या संस्थेची नोंदणीच केली नव्हती. अश्या नोंदणी नसलेल्या व कोणताही इतिहास नसलेल्या संस्थेला केंद्र सरकार थेट १०० कोटी रूपये (१९९१ मधील १०० कोटी रूपये म्हणजे आजचे जवळपास २००० कोटी रूपये असावे) कसे देऊ शकते असा विरोधकांनी आक्षेप घेऊन देणगी देण्यास विरोध केला होता. नंतर घाईघाईने नोंदणीची औपचारिकता पार पाडली गेली.
या संस्थेने मागील ३४ वर्षात कोणकोणती समाजापयोगी कामे केली हे कोणास माहिती असल्यास सांगावे.
20 Apr 2025 - 6:59 pm | सोत्रि
कुतुहल म्हणून राजीव गांधी फाउंडेशनची वेबसाईट बघितली, बोर्ड मेंबर्स बघून भरून पावलो :)
https://rgfindia.org/our-board-rajiv-gandhi-foundation/
- (सद्गदीत झालेला) सोकाजी
19 Apr 2025 - 3:13 pm | वामन देशमुख
या विद्यापीठांची हवी तशी रँकिंग काढणारे लोक कोण? डावेच.
20 Apr 2025 - 7:13 am | युयुत्सु
१. एखादी व्यक्ती जितकी तल्लख बुद्धीची पण ती तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते.
कृपया लिंक द्यावी.
२.कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था अधिक चांगले काम करते हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवितात.
आठवड्याला ७० तास काम सारख्या कल्पना डाव्यांकडून येतात की उजव्यांकडून?
20 Apr 2025 - 6:08 pm | चंद्रसूर्यकुमार
एकूणच मिरची बरीच झोंबलेली दिसते. तुमच्या मुळातल्या धाग्याचा उपहास म्हणून हा धागा आहे आणि या धाग्यातील दाव्याचा- "एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते" उपहास म्हणून मी हा दावा केला आहे की सुमार बुद्धीचे नाही तर तल्लख बुध्दीचे पण बुध्दी गहाण ठेवलेले लोक डावीकडे झुकतात. तरी लिंकच हवी असेल तर अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये डावीकडे झुकणार्या प्रोफेसरांची संख्या उजवीकडे झुकणार्यांपेक्षा गेल्या काही वर्षात बरीच वाढली आहे याविषयी https://www.washingtontimes.com/news/2016/oct/6/liberal-professors-outnu... ही एक लिंक आहे आणि तो बुध्दी गहाण टाकणारा प्रकार आहे असे मला का वाटते त्याची कारणे https://fee.org/articles/why-most-academics-tilt-left/ या लिंकमध्ये बरीचशी आहेत. दोन्ही लिंक २०१८ मधील आहेत.
20 Apr 2025 - 8:01 pm | युयुत्सु
एकूणच मिरची बरीच झोंबलेली दिसते
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एवढ्याशा कारणाने जर मिरच्या झोपायला लागल्या तर जगणं कठीण होईल
पण लिंक बद्दल मनःपूर्वक धन्यवाद